पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणात छोटा राजन सहित १० आरोपी दोषी

    02-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणात आज मुंबईचे विशेष मकोका न्यायालयाने सुनावणी केली असून या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन सहित ११ आरोपी दोषी ठरले आहेत. सात वर्ष जुन्या प्रकरणावर आज मुंबईचे विशेष मकोका न्यायालय सुनावणी केली आहे. अजून छोटा राजन याला शिक्षा काय होणार यावर चर्चा केली जात आहे. 
 
जून २०११ मध्ये जे डे पत्रकार यांची हत्या झाल्यावर देशभरातील पत्रकारांनी देशभर आंदोलन केले होते. या प्रकरणाची प्रथम चौकशी मुंबई पोलिसांनी सुरु केली होती. त्यानंतर या प्रकरणाला सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. २०१५ नंतर इंडोनेशियामधील बालीमध्ये अटक केल्यावर पत्रकार जे डे हत्याकांड हे पहिले प्रकरण आहे, ज्यात छोटा राजन याच्या विरोधात खटला चालवण्यात आला होता. 
 
 
 
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान छोटा राजन याला दिल्ली येथील तिहाड कारागृहात ठेवण्यात आले होते. आणि तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात त्याची उपस्थिती धरली जात होती. आज या सात वर्ष जुन्या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली आहे. आता या १० आरोपींना आणि छोटा राजन याला काय शिक्षा दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल. 
 
 
 
जे डे हत्याकांड काय आहे? 
 
 
११ जून २०११ रोजी दुपारी मुंबईतील पवई येथे मिड डे नावाच्या इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम करणारे जे डे पत्रकाराची पाच गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. ही हत्या अंडरवर्ल्डच्या गुडांनी केली होती. जे डे आपल्या दुचाकीवर जात असतांना अचानक काही अज्ञात माणसांनी त्यांच्या पुढे येवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांना नेल्यावर तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.