लेवा पाटीदार गुजर समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळाश्रीक्षेत्र प्रकाशाला शांतता आणि चैतन्यपूर्ण वातावरणात ३३ जोडप्यांचे शुभमंगल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 
लेवा पाटीदार गुजर समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळा
श्रीक्षेत्र प्रकाशाला शांतता आणि चैतन्यपूर्ण वातावरणात ३३ जोडप्यांचे शुभमंगल
 
शहादा, 
संगीतमय मंगलाकष्टकांच्या सुरात तापी, गोमाई, पुलिंदा नद्यांच्या संगम, केदारेश्‍वर महादेव, माता अन्नपूर्णेसह देशभरातील विविध मान्यवर व जनसमुदायाच्या साक्षीने प्रकाशा ता. शहादा येथे सोमवारी लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामुदायिक विवाह सोहळा ३३ जोडप्यांना विवाहबध्द करून यशस्वीरित्या पार पडला.
दक्षिण काशी प्रकाशा (ता.शहादा) येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ‘ग्लोबल सामुदायिक विवाह’ पार पडला. सोमवारी या सामुदायिक विवाह सोहळ्यात ३३ जोडप्यांना विवाहबध्द करण्यात आले.
 
 
गुजर समाज महासंघाचे अध्यक्ष दीपक पाटील हे अध्यक्षस्थानी होते. खा.हिना गावित, आ. डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ. ऍड.के.सी.पाडवी, माजी आ. ऍड. पदमाकर वळवी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख संजय पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी, भाजपचे सुरत जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नेपालसिंग कसाणा (दिल्ली), बच्चुसिंग (राजस्थान), ए.पी.सिंग गुजर (मध्यप्रदेश) पालकराम चौधरी (उत्तरप्रदेश), जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, चंद्रकांत पटेल, उद्योजक लवजी पटेल (गुजरात), हरी पाटील, ईश्‍वर पाटील, सुनील पाटील, विजय पाटील आदींसह देशाच्या विविध भागातून आलेले मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
प्रारंभी भगवतगीतेसह माता अन्नपूर्णा, सरदार वल्लभभाई पटेल, माजी आमदार पी.के. अण्णा पाटील, डॉ.विश्राम पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. तत्पूर्वी वरांची सजलेल्या ट्रॉलीवरुन सवाद्य वरात निघाली. लग्नमंडपात त्यांचे स्वागत झाले.
दिलेल्या क्रमांकानुसार त्या-त्या जागेवर वधू-वरांना बसवण्यात आले. सकाळी ९.२१ च्या नियोजित मुहूर्तावर संगीतमय मंगलाष्टकांच्या सुरात अतिशय शांततापूर्ण व चैतन्यमय वातावरणात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली.
केवळ हौस, मोैज, मानपमान, बडेजाव यासाठी वेळ, श्रम, पैसा व्यर्थ न दवडण्याचा संदेश देणार्‍या या सोहळ्याला वर्‍हाडी मंडळीसह देशभरातील राजकीय, समाजिक पदाधिकारी, उद्योजकांनी हजेरी लागली.
प्रकाशा परिसर हजारो समाज बांधवांच्या वर्दळीने आणि वाहनांच्या प्रचंड दाटीने गजबजून गेला होता
 
 
संगीतमय मंगलाष्टकांचे सूर
तापी, गोमाई, पुलिंदा नद्यांचा संगम साक्षीला
केदारेश्‍वर महादेव, माता अन्नपूर्णा देवतेचे सानिध्य
देशभरातील विविध मान्यवर व प्रचंड जनसमुदाय सहभागी
प्रारंभी देवता आणि थोर नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन
नवरदेवांची सजवलेल्या ट्रॉलीवरुन वरात
वरांना नियोजित क्रमांकानुसार केले स्थानापन्न
भोजन व्यवस्थेत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर
समाजधुरिणांनी संस्कृतीचे जतन करीत सामुदायिक विवाह सारखे उपक्रम राबवत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. समाजाच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करु. त्याशिवाय सभा मंडप उभारणीसाठीही मदत करु.
- डॉ.हिना गावित, खासदार
वेळ, काळ आणि परिस्थिती यांची सांगड घालीत विविध उपक्रमात अग्रेसर राहणारा हा समाज आदर्श निर्माण करीत आहे. शासनाच्या स्वच्छता अभियान, जलयुक्त शिवार उपक्रमात समाजाचे योगदान आहे. त्यातच या विवाह सोहळ्यात भोजनावेळीचे साहित्य पर्यावरणावादी (ईको फ्रेन्डली) वापरुन नवा संदेश दिला आहे.
- डॉ.कलशेट्टी, जिल्हाधिकारी
लेवा पाटीलदार गुजर समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असतांना काळाची गरज पाहून सामुदायिक विवाह सोहळा हा अभिनव उपक्रम सुरु केला, हे कौतुकास्पद आणि सार्‍यांना प्रेरक आहे. त्यासोबतच नियोजित सभा मंडपाच्या उभारणीसाठी मी २१ हजार रुपयाची देणगी देत आहे.
- उदेसिंग पाडवी, आमदार
आपण विविध विकासकामांना सातत्याने मदत करीत असतो. लेवा पाटीदार गुजर समाजाच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करू.
- विजयकुमार गावीत, आमदार
लेवा पाटीदार समाजाचेही एक नवीन चळवळ हाती घेतली आहे. त्यातच पर्यावरणातील समतोल राखत हा भव्य-दिव्य सोहळा यशस्वी करणे, हे उल्लेखनीय आहे.
- के.सी.पाडवी, आमदार
परिसरातील समाजाची लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरते. समाजाचे संघटन आदर्शवत आहे. समाजाने घेतलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होते. मी संस्थेला ३३ हजार देणगी देत आहे.
- चंंद्रकांत रघुवंशी, आमदार
गुजरात व महाराष्ट्र राज्यातील तापी काठावरील लेवा पाटीदार गुजर समाजाची संख्या लक्षात घेता, समाजाला किामन राज्यसभेत नेतृत्त्वाची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- नेपालसिंह कसाना, दिल्ली
विकासासाठी समाज संघटनेसह सर्वांनी तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. गेल्या ३० वर्षापासून समाजातील तरुणही समाजउन्नतीच्या कार्यात पुढे आले आहेत. आजचा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यात विविध शहर व ग्रामलेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
- अभिजित मोतीलाल पाटील, जि.प.सदस्य
समाजाने घेतलेल्या निर्णयाचे एकमुखाने एकदिलाने स्वागत होत असते. त्यामुळेच समाज एकसंघ राहिला आहे. समाज आजतागायत राजकारण विरहित राहिला आहे. यापुढे ही काम करणार्‍यांचा आदर होईल. येथील भव्य प्रांगणात विविध कार्यक्रम करता यावेत या दृष्टीने भव्य सभा मंडप उभारण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. समाजाने उदार मनाने व कर्तव्यभावनेने सहकार्य करावे
- दीपक पाटील, समाजाचे अध्यक्ष.
 
@@AUTHORINFO_V1@@