तंटामुक्त पुरस्कारासाठी पत्रकारांकडून प्रवेशिका आमंत्रित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००७ पासून राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची वृत्तपत्रातून व्यापक प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकारांकडून १५ जून २०१८ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहे.
 
 
 
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची व्याप्ती व महत्व अनुलक्षिता हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता ती व्यापक लोकसहभागाची चळवळ होणे आवश्यक आहे. छोटयाछोटया कारणांवरुन निर्माण होणारे तंटे ग्रामपातळीवरच समोपचाराने मिटवून व भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत असे वातावरण निर्माण करुन लोकांनी स्थायी विकासाच्या मार्गावरुन वाटचाल करावी, असा व्यापक उद्देश मोहिमेमागे आहे.
 
 
 
सकारात्मक पत्राकारितेचा भाग म्हणून हा विचार, प्रसार माध्यमे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यादृष्टीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीरीत्या राबविण्यामध्ये पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतात.
 
 
 
पुरस्कारासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक निकष मिळून १०० गुण आहेत. आहेत संख्यात्मक तपशिलात बातम्या, वृत्तांकन, फोटो फिचर्स, लेख अग्रलेख, यांची संख्या यासाठी ४० गुण आहेत. साहित्य 'अ' वर्गवारीतील दैनिकात प्रसिध्द झाले असेल तर त्याला मिळालेल्या एकूण गुणांच्या १० टक्के जादा गुण देण्यात येतात. ब वर्गवारीतील दैनिकास ५ टक्के ज्यादा गुण देण्यात येतात. अशाप्रकारे या परीक्षेचा आराखडा असणार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@