वैदिक मंत्रोच्चारासह कोविंद यांनी केली पुष्कर सरोवराची पूजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |


पुष्कर : दोन दिवसीय राजस्थान दौऱ्यावर असलेल्या भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पुष्कर येथील पवित्र अशा पुष्कर सरोवराची सहकुटुंब विधिवत पूजा केली. वैदिक मंत्रोच्चारांसह आपल्या पत्नी आणि मुलीसह राष्ट्रपतींनी या सरोवराचे पूजन केले, तसेच येथील धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले.

राजस्थान दौराच राष्ट्रपती कोविंद यांचा आज दुसरा दिवस आहे. आपल्या या दुसशी दौऱ्यामध्ये कोविंद यांनी राजस्थानमधील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. सर्वात प्रथम ते अजमेर येथील प्रसिद्ध मोहम्मद चिश्ती दर्गामध्ये गेले. याठिकाणी जाऊन येथील प्रमुख धर्मगुरूंशी आणि दर्ग्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यानंतर दर्ग्यावर चादर अर्पण करून ते पुष्कर येथे आले.

पुष्कर येथे आल्यानंतर राष्ट्रपतींनी याठिकाणी असलेल्या जगातील एकमेव अशा ब्रह्मदेवाच्या मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर आपल्या कुटुंबांसह पुष्कर तलावाचे दर्शन घेऊन याठिकाणी पूजा केली. यावेळी मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वैदिक मंत्रोच्चारांसह कोविंद यांनी पुष्कर सरोवराचे पूजन केले. व याठिकाणी असलेल्या इतर मंदिरांचे देखील दर्शन घेतले.

@@AUTHORINFO_V1@@