आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करा-विजय भाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |
 
 

 
 
 
निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे
 
मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक
 
 
भंडारा : नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्हयातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहानी, पशुहानी तसेच वित्तहानी, शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक उदभवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे. सोबतच प्रत्येक विभागाने आपली एसओपी तयार करुन १५ दिवसात सादर करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिल्या. 
 
 
 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. 
 
 
 
निवासी उपजिल्हाधिकारी पुढे म्हणालकी, वन विभागाने तेदुपत्ता संकलन संस्थाना जगलात आगी लावू नये असे निर्देश देण्यात यावेत. तसेच कोणीही जंगलात आग लावून नये त्यामुळे वन व वन्यजीव हानी पोहचून नैसर्गिक संपत्तीची हानी होते. आपपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करुन यादीसह आपत्ती व्यवस्थापन शाखेस सादर करावे. या कामास प्राधान्य दयावे, हयगय करु नये. सर्व गावात मान्सून पूर्व जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून मुलभूत बचाव कार्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण लवकर आयोजित करण्याच्या सूचना भाकरे यांनी दिल्या. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@