#MondayMotivation

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018   
Total Views |

 
 
वीकएण्ड संपला की सगळं अवसानच गळून पडतं. पुन्हा तोच सोमवार, पुन्हा तीच तीच कामं, तेच रुटीन. एकूणच वीकएण्ड संस्कृती शहरांमध्ये सुरु झाल्या पासून सोमवारी कामाला जाणं जीवावर येतं हे मात्र खरं. लहान मुलांचं कसं असतं, २ दिवसांच्या सुट्टीनंतर शाळेत जाताना त्रास होतो. तसंच काहीसं मोठ्या माणसांचं देखील होतं. मात्र त्यांच्या मदतीला नेहमीप्रमाणे सोशल मीडिया आहेच. दर सोमवारी तुम्हाला देखील ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक अशा पोस्ट्स दिसल्या असतील ज्यामध्ये #MondayMotivation या हॅशटॅगचा वापर करण्यात येतो. सोमवारी पुन्हा आठवडा नव्या उमेदीने सुरु करण्यासाठी सुरु करण्यात आलेले हे  #MondayMotivation.
असं म्हणतात माणसाला प्रोत्साहन, उमेद, म्हणजेच मोटीव्हेशन कशातूनही मिळू शकतं. त्यातून जेव्हा मुद्दा येतो व्यायामाचा तेव्हा तर नक्कीच या 'मनडे मोटीव्हेशन'ची आवश्यकता असते. कारण नाही म्हटलं तरी व्यायाम आवडीने करणारे लोक कमीच असतात. अभिनेता रणवीर सिंह याने आज आपल्या लहानपणीचा व्यायामाच्या सायकलीवरचा फोटो #MondayMotivation च्या अंतर्गत शेअर केला आहे. तर गुरमीत चौधरी या कलाकाराने देखील स्वत:चा व्यायाम करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. आणि आपले 'मसल्स' दाखवत "आज जरी दुखत असले तरी उद्या ताकदवर होतील" असे लिहीले आहे. एकूणच व्यायाम आणि #MondayMotivation याचं जवळचं नातं आहे, असं म्हणता येईल.





तर अनेकदा 'ज्ञान' देणाऱ्या काही पोस्ट्स #MondayMotivation या नावाखाली शेअर केल्या जातात. यामध्ये आयुष्याचं ज्ञान असतं, नाते संबंधांचं ज्ञान असतं, आणि असं भरपूर ज्ञान असतं, ज्याचा खरा वापर किती लोक करतात माहीत नाही, किंवा ते खरंच उपयोगाचं असतं का माहीत नाही मात्र अनेक लोक #MondayMotivation च्या नावाखाली भरपूर ज्ञान देतात. यामध्ये काही चांगल्या प्रोत्साहन देणाऱ्या घटना असतात, किंवा तत्सम काही देखील असतं.






तर अनेकदा या मनडे मोटीव्हेशनमध्ये खाण्याच्या पदार्थांचे फोटोज असतात. जेवण, खाणं यातं शौकीन कोण नाही? प्रत्येकालाच जीभेचे चोचले पुरवायला खूप आवडतात. आणि खाद्य पदार्थांमधून "मोटीव्हेशन" मिळतं हे मात्र अगदी खरं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट्स देखील खूप व्हायरल होतात. यामध्ये अगदी भरलेल्या भारतीय "थाली" पासून ते फ्रेंच क्रोसेंट्स पर्यंत सगळंच आलं.

या मनडे मोटीव्हेशनमध्ये मीम्सचा समावेश देखील आहेच. आजकाल मीम्स शिवाय कुठलेच समाज माध्यम पूर्ण होत नाही. मग त्यात एखाद्या नवीन सिनेमावरील मीम्स असू देत, किंवा समोवाराशी संबंधित कुठला ही विनोद.
 



 
 
काम करत असताना चहा कॉफी पिण्याची सवय अनेकांना असेल. त्यातून पावसाळी वातावरणात काम करायचे असेल तर कॉफी, चहाची तल्लफ आल्याशिवाय राहत नाही हे अगदी खरं आहे. अशा चहा आणि कॉफीचे देखील सुंदर फोटोज लोक सोमवारी काम करण्यासाठी सज्ज होताना शेअर करताना दिसतात.
 
 
 
 
एकूणच शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर काम करण्याचे बळ मिळण्यासाठी देखील आता लोक सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. त्यातूनच हे #MondayMotivation जन्माला आले आहे. आणि त्यातूनच अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडियोज, फोटोज लोक समाज माध्यमातून शेअर करतात. प्राण्यांविषयी प्रेम असणारे प्राण्यांचे फोटोज, तर लहान बाळांचे फोटोज, तर मीम्स आता या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सोमवारी काम करण्यासाठी बळ मिळणार आहे.
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@