बनावट बियाणे साठाशेतकरी व शासनाची १ लाख ७२ हजारांची फसवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
 
बनावट बियाणे साठा
शेतकरी व शासनाची १ लाख ७२ हजारांची फसवणूक
नंदुरबार , ११ मे
बोगस तसेच महाराष्ट् राज्यात बंदि असलेले बियाणे प्रकरणी शेतकरी व शासनाची १ लाख ७२ हजाराची फसवणूक केली म्हणून म्हसावद पोलिस ठाण्यात १० रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
 
पोपटभाई, पासाभाई मालवीय वय ४५ रा. चिखली फाटा, पटेल गॅरेज, म्हसावद ता. शहादा. यंानी १० प्रकारचे बनावट आर.आर.बी.टी.कापूस बियाणे. या कापुस बियाण्याला महाराष्ट् राज्यात परवानगी नसल्यामुळे तसेच बियाणे उत्पादकाच्या गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादकाचा बनावट उल्लेख असल्यामुळे, तसेच विनापरवाना चिखली फाटा पटेल गॅरेज मध्ये बियाणे साठवणुक व विक्री करुन शासनाची व शेतकर्‍याची फसवणूक केली म्हणून १० रोजी दुपारी २ वाजे दरम्यान पटेल गॅरेज मध्ये कारवाई केली असता. १ लाख ७२ हजार ५० रुपये किमतीचे बनावट बियाणे १८५ नग मिळून आले.
 
अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुण नियंत्रक जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय नंदुरबार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दाभाडे करत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@