भंडारा- गोंदिया लोकसभा पोट निवडणुक-२०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
निवडणूक निरिक्षक भंडाऱ्यात दाखल
 
 
भंडारा : भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक एन. बी. उपाध्याय, शफुल हक व तेजपाल सिंग फुल्का हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. निवडणूक निरिक्षकांचा मुक्काम शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे राहणार आहे.
 
 
निवडणूक निरिक्षक सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत भंडारा येथे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिक आपल्या तक्रारी व समस्या त्यांना उपरोक्त वेळात प्रत्यक्ष भेटून सांगू शकतात. असे जाहीर करण्यात आले आहे. 
 
 
निवडणूक निरिक्षक भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदान केंद्राची पाहणी करतील. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱ्यात सुद्धा निवडणूक निरिक्षक यांना भेटून नागरिक संवाद साधू शकतात.
 
@@AUTHORINFO_V1@@