दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राजा शिवछत्रपती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

    09-Apr-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली :  दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ६ ते १० एप्रिल या काळात आयोजित करण्यात आलेल्या 'राजा शिवछत्रपती' या महानाट्याचा आजचा प्रयोग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीकरांनी सलग चौथ्या दिवशी या महानाट्याला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शरद बोबडे देखील उपस्थित होते. 
 
 
 
 
गेल्या चार दिवसांपासून दिल्ली येथे राजा शिवछत्रपती हे महानाट्य लाल किल्ल्यावर सुरु आहे. यामध्ये साधारण ३०० कलाकार एकत्र आले ओहत. तर या महानाट्यात जीवंत घोडे आणि उंटांचा प्रयोग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात या महानाट्याचा आनंद घेण्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुखभाई मांडविया, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य आदी मान्यवरांनी महानाट्यास उपस्थिती दर्शवली.
 
 

 
 
 
 
या महानाट्यासाठी चार मजली फिरता रंगमंच उभारण्यात आला आहे. २५० हून अधिक कलाकार यात सहभागी झाली आहेत. हत्ती, घोडे, ऊंट यावरुन निघणारी महानाट्यातील मिरवणूक व फटाक्यांची आतशबाजी खास प्रेक्षकांसाठी खास आकर्षण आहे. दिनांक ११ एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी 6.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत या महानाटयाचे सादरीकरण होणार आहे.
 

पंतप्रधानांनी केले आवाहन :

मुंबई येथे झालेल्या महामेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राजा शिवछत्रपती या महानाट्याविषयी सांगत सर्व देशातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने या महानाट्यास उपस्थित राहण्यास आवाहन केले होते. मराठीतील सुप्रसिद्ध 'जाणता राजा' या महानाट्याचे हिंदी रुपांतरण म्हणजेच 'राजा शिवछत्रपती'. दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या महानाट्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. 

 
यावेळी दरम्यानलाल किल्ल्या समोरील माधवदास पार्क येथे ‘राजा छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या स्पर्धेत भाग घेतला.
 
६ एप्रिल रोजी अवकाळी पावसामुळे प्रयोग थांबवावा लागला हा प्रयोग आता ११ एप्रिल रोजी आयोजित करणार असल्याचे आयोजन समितीने जाहीर केले आहे.