प्रतिकूलतेवर मात करण्याची आदिवासींची उपजत ताकद; एव्हरेस्ट सर करेल: विष्णू सावरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चंद्रपूरचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवतील- सुधीर मुनगंटीवार
 
 
 
चंद्रपूर : कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते, हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने अनुभवला. जिल्हयातील आदिवासी शाळेतील १० विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील दोन दिग्गज मंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर यशस्वी व्हा ! अशी प्रेमाची थाप दिली आणि यासोबतच प्रवास सुरु झाला गड चांदा ते एव्हरेस्टचा !
 
 
 
चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील १० आदिवासी विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. आज चंद्रपूरमध्ये खचाखच भरलेल्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शितारामआडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा आदींच्या प्रोत्साहनपर शब्दानंतर या १० आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात चंद्रपूरचा झेंडा दिला गेला.
 
 
 
 
या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी गेल्या वर्षभरात केलेल्या खडतर परिश्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. काही मिनीटांच्या या चित्रफितीने मुलांच्या साहसाची कल्पना आली. सोबतच एव्हरेस्ट चढून जाणे हे किती कठीण काम आहे. त्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द आणि पैसा याचीही सभागृहातील उपस्थितांना कल्पना आली. 
@@AUTHORINFO_V1@@