राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांना पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

सर्व आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत; शिवसेनेची भूमिका


नगर : शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राप जगताप यांच्यासह चार जणांना नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना नगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने या सर्वांना येत्या १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  
शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर यांना नगर पोलिसांनी आज अटक केली. यानंतर या सर्व जणांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी जगताप यांच्या वकिलांनी 'जगताप यांच्या या हत्येशी कसलाही संबंध नसल्याचे मत न्यायालयासमोर मांडले. तसेच फक्त राजकीय वैमनस्यातूनच त्यांचे नाव याप्रकारांमध्ये गोवले जात असल्याचे त्यांनी म्हटले. यावर न्यायालयाने या प्रकरणाची पाहणी करून या चौघांही १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याच बरोबर याघटनेनंतर जिल्ह्यातील आणखी काही राजकीय नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत पोलिसांनी एकूण ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका भाजप नेत्याच्या देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आरोपींना अटक करण्यात यावी, म्हणून शिवसेनेकडून केडगावसह जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. तसेच एक मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते. जोपर्यंत या हत्येतील सर्व आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत मृत शिवसैनिकांचे अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनी घेतली आहे.
@@AUTHORINFO_V1@@