अहमदनगर येथे दोन शिवसेना कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या, शिवसेनेचा मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

 
 
अहमदनगर :  अहमद नगर येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती. केडगावमधील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अहमद नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. या घटनेविरोधात अहमदनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.
 
अहमद नगर येथे बंद :
 
दिल्ली गेटपासून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. २ शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. तेसच अहमद नगर येथे बंद पुकारण्यात आला आहे, तसेच अहमदनगर शहरातील बाजारपेठाही कडकडीत बंद आहेत.
 
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अरुण जगताप यांच्यासह अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@