पाणपोईच्या माध्यमातून आजार आणि रोगांविषयी जनजागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

जिल्हा हिवताप कार्यालयाचा अनोखा उपक्रम

 

बुलडाणा : उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये परिसारत नागरिकांना अनेक साथीच्या आणि किटकजन्य आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती नसल्यामुळे अनेकांना हे आजारांना बळी पडावे लागते, त्यामुळे या आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने सध्या बुलडाण्याच्या जिल्हा हिवताप कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबला असून पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांना किटकजन्य रोग तसेच इतर अजारणची माहिती दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात या उपक्रमाचे अत्यंत कौतुक केले जात असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच आजारांविषयी माहिती मिळत आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने कार्यालयाच्या परिसरात पाणपोई लावण्यात आली आहे. या भागात रूग्णालयांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर रूग्ण याठिकाणी येत असतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज याठिकाणी सातत्याने जाणवत असते. ही गरज लक्षात घेऊन तसेच यातून काही सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी चव्हाण यांनी स्वखर्चाने या पाणपोईची व्यवस्था केली. तसेच या पाणपोईच्या माध्यमातून किटकजन्य आजरांविषयी जनजागृती व्हावी, म्हणून किटकजन्य आजारांची माहिती देणारे फलक, बोर्ड या पाणपोईच्या भोवती लावण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठी आलेल्या नागरिकांना पाण्याबरोबरच आजारांविषयी माहितीसुद्धा मिळत आहे.
@@AUTHORINFO_V1@@