५ लाख भारतीयांचा डेटा कॅम्ब्रीज अॅनालिटीकाला झाला शेअर; फेसबुकचा गौप्यस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

 
फेसबुक डेटा लिक प्रकरणाने आणखी एक वळण घेतले आहे. फेसबुकतर्फे जाहीर केलेल्या यादीत तब्बल ५ लाख भारतीयांचा डेटा कॅम्ब्रीज अॅनालिटीकासोबत शेअर झालेल्याचे माहिती पडते. यामुळे भारतात नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
 
 
डेटा अॅक्सेस प्लॅनसाठी फेसबूकचे नवीन अपडेट आले आहे. त्यात अविश्वसनीय अॅप्सला बंदी घातल्याची माहिती देण्यात आली असून, कुठल्याही प्रकारे युजार्सचा डेटा चोरी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. यात माहिती देताना फेसबुकने प्रत्येक देशातील चोरी झालेल्या डेटाची माहिती उघड केली आहे.
 

 
 
यात सर्वात प्रथम क्रमांक अमेरिकेचा लागतो. तब्बल ७ कोटी अमेरिकी नागरिकांचा डेटा कॅम्ब्रीज अॅनालिटीका सोबत शेअर झाला असून, दुसऱ्या क्रमांकावर फिलिपिन्स येथील ११ लाख नागरिकांचा डेटा शेअर झाला आहे. यापाठोपाठ इंडोनेशिया येथील जवळपास १० लाख नागरिक देखील सामील असल्याचे उघडकीस आले आहे. या यादीत भारताचा ७ वा क्रमांक लागत असून, एकूण ५ लाख ६२ हजार ४५५ एवढे भारतीय नागरिकांचे खाते सामील आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@