पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |


आता प्रत्येक सोमवारी होणार जनता दराबार
 
जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १५४ तक्रारी प्राप्त




अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या उपस्थिती पार पडत असलेल्या जनता दरबाराला नागरिकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यापुढे हा जनता दरबार प्रत्येक सोमवारी भरवण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घेतला आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी यापुढे जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काल झालेल्या जनता दरबारात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत एकूण १५४ तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. यानंतर विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगून पालकमंत्री यांनी सांगितले. तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनासह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच यावर्षीचा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे सर्व माहिती विभागप्रमुखांनी बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले.


याच बरोबर पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@