दोनदा भूमीपूजन होवूनसुध्दाकामास मुहूर्त गवसेना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

 
 
दोनदा भूमीपूजन होवूनसुध्दा
कामास मुहूर्त गवसेना
 
शिंदखेडा, २८ एप्रिल
शिंदखेडा शहरातील भाजी मंडई आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामास आरंभ आदेश निघून ६ महिने झाले. नगरपंचायतीने ही जागा मोकळी करुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिलेली नाही. या कामाचे दोनदा भूमिपूजन होऊन देखील कामास सुरुवात झालेली नाही.म्हणून कॉंग्रेसचे नगरपंचायतीचे गट नेते सुनिल चौधरी यांनी नगराध्यक्षा रजनी वानखेडे व मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.
 
या निवेदनात म्हटले की, या ठिकाणी दोनच अतिक्रमणधारक आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना विश्वासात घेऊन आतिक्रमण काढता येऊ शकते. पण याबाबत नगरपंचायतीने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. तसेच या जागेत विद्युत वितरण कंपनीची रोहित्रे देखील या ठिकाणाहून निष्कासित झाली आहे. ती काढण्याबाबत का कारवाई केली नाही. काम लवकर सुरु करण्याबाबत संबंधित यंत्रणेला जागा लवकर उपलब्ध न करुन दिल्यास त्यासाठीचा निधी परत जाऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त केली आहे.
 
जागा लवकरात लवकर उपलब्ध न करुन दिल्यास नाईलाजासत्व उपोषणास बसावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देेतांना नगरसेवक दीपक आहिरे, उदय देसले, मीरा पाटील, सुरज देसले यांची उपस्थिती होती.
 
@@AUTHORINFO_V1@@