राज्यातील नवउद्यमींसाठी लवकरच इनोव्हेशन हब

    25-Apr-2018
Total Views |

राज्यपालांची सकारत्मक भूमिका, अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश



मुंबई : राज्यातील नव उद्यमींसाठीच्या उपक्रमशीलतेला अधिका चालना देणाऱ्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेला राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला असून यासाठी अभ्यास गटांकडून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नव उद्यमींसाठी लवकरच परदेशाची कावडे अगदी सहजरित्या उघडी होती, अशी अशा राज्य सरकारने व्यक्त केली आहे.
टी-हब या संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे आज राजभवनात सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर, मुख्यमंत्री फडणवीस, टी-हब संकल्पनेचे संस्थापक बी. व्ही. आर. मोहन रेड्डी, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह सरकार तसेच टी-हबचे अनेक महत्त्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. या संकल्पनेच्या सादरीकरणानंतर राज्यपाल राव यांनी या संकल्पनेचे कौतुक करत, याचा राज्यातील नवउद्यमींना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची तातडीने पूर्तता करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिली.

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील नव उद्यमींच्या विकासासाठी देश आणि विदेशातील उद्यमशील उपक्रमांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिली. त्यासाठी टी-हब आणि नॅसकॅाम या संस्थांच्या समन्वयातून एका अभ्यास गटाच्या माध्यमातून अशा विविध संधी, पर्यायांचा पडताळा घेण्यात यावा. यावर एक अहवाल तयार करून लवकरात लवकर सरकार समोर सादर करावा, अशी सूचना दिली.