डॉक्टरांचे सामाजिक भान हीच त्यांची प्रतिष्ठा आहे : सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
चंद्रपुरातील आयएमएच्या नव्या कार्यकारणीचे पदग्रहण
 
 
चंद्रपूर : भारतीय समाजातील डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम देवाच्या तुलनेची राहिली आहे. ती अजूनही त्याच उंचीवर कायम आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिगत व सामुदायिक सहभागातून समाजाला कायम मदतच झाली आहे. तुमच्या प्रॅक्टिस एवढेच तुमचे सामाजिक भान तुमच्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवत असते, त्यामुळे येणाऱ्या काळातही आपल्या समुदायाकडून हे सामाजिक भान अधिक मोठ्या प्रमाणात जपले जावे त्यातून समाजाचे भले व्हावे ,अशा शब्दात राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयएमएच्या नवनिर्वाचित चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
चंद्रपूर येथील आयएमएच्या हॉलमध्ये आयोजित एका शानदार कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीने पदग्रहण केले. या पदग्रहण समारंभाला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मोरे, आयएमएच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ वाय. एस.देशपांडे, चंद्रपूर येथील आयएमएचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
 
 
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एका डॉक्टर परिवारातील सदस्य असल्यामुळे डॉक्टरांच्या सामाजिक दायित्वाची मला कायम जाणीव आहे. समाजातील अन्य व्यवसायाप्रमाणे डॉक्टरांमध्ये देखील काही उपद्रवी मूल्यांमुळे डॉक्टरांच्या व्यवसायाची प्रतिमा मलिन झाल्याबाबत याठिकाणी बोलले गेले. मात्र ही वस्तुस्थिती नाही. समाजामध्ये आजही डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम असून या व्यवसायाबद्दल प्रचंड आदर आहे. हा आदर वाढावा यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आपले सामाजिक भान कायम ठेवले पाहिजे, या प्रोफेशन बद्दल किती आदर आहे ही बाब देशातील सर्वोच्च पद्म पुरस्कारांची यादी तपासली तर लक्षात येईल. सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी या व्यवसायातील अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे.
@@AUTHORINFO_V1@@