चंद्रपुरातील भोई समाजाच्या २०० मुलांच्या चमूला अत्याधुनिक मासेमारीचे प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही


चंद्रपूर : मत्स्यव्यवसाय संदर्भात चंद्रपूरमध्ये राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाय योजनांना अधिक गतीशील करण्यात येईल. त्यातून राज्याच्या पूर्व भागात गोडया पाण्यात मत्स उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भोई समाजाला अधिक सशक्त करण्यात येईल. त्यासाठी समाजातील २०० मुलांच्या आधुनिक प्रशिक्षणाबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी शिष्टमंडळाला दिले.
 
 
 
 
चंद्रपुर जिल्ह्यातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आपल्या कष्टाने जपणाऱ्या भोई समाजाच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी शनिवारी रात्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. नियोजन भवनात या समाजाच्या मान्यवरांनी आपल्या विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे ,चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे , डॉ दिलीप शिवरकर, बंडू हजारे , नगरसेवक राजीव गोलीवार, अरूण तिखे यांच्यासह भोई समाजाचे प्रतिनिधी ‍उपस्थित होते.
 
 
 
 
या बैठकीमध्ये या समाजाच्या विविध संस्थांच्या संदर्भातील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मत्स्यव्यवसायाच्या संदर्भातील शासकीय प्रयत्न व त्याला मिळणारा प्रतिसाद यावरही चर्चा झाली. भोई समाजाच्या मासेमारी संदर्भातील शीर्ष संस्थांना कार्यालय स्थापनेबाबत मदत करणे, कौशल्य विकास विभागांतर्गत त्यांना मदत करणे, यासंदर्भात चर्चा झाली. 
 
 
 
मासेमारीच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासोबतच मत्स्य निर्मिती आणि संगोपनाबाबतही आधुनिक तंत्रज्ञानाने स्थानिक भोई समाजाला अधिक प्रगत करण्याबाबत काही मागण्या पुढे आल्या. राज्य शासन मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी आग्रही असून राज्याला लाभलेल्या विपुल समुद्र किनार्‍यासोबतच चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पारंपारिक तलावातील मच्छीमारीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायात भर पडत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 
@@AUTHORINFO_V1@@