दिल्ली : प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे. रस्त्यावर अनेक दुर्घटनांमुळे अने परिवार उध्वस्त होतात. त्यामुळे आपले हे कर्तव्य आहे की आपण रस्त्यावर सुरक्षेची काळजी घ्यावी. स्वत:ची काळजी घ्यावी आणि रस्त्यावर चालणाऱ्या इतरांची देखील. त्यामुळे आपण रस्ता सुरक्षेचा संकल्प घेऊया. असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पुढील एक आठवडा देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी नितीन गडकरी यांनी सर्व देशवासियांना आवाहन केले आहे. तसेच रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचे तसेच नवीन रस्त्यांचा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे, तसेच खराब रस्त्यांचा विकास लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक वाहतूकीच्या नागरिकांनी वापर करावा :
यावेळी गडकरी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीवर अधिक भर देण्याचे आवाहन केले. "देशात आज अनेक घरांमध्ये परिवारातील प्रत्येका सदस्याजवळ चारचाकी वाहन आहे. खरे तर चारचाकी घेण्याचा अधिकार सगळ्यांकडेच आहे, मात्र देशाच्या वाहतूकीसाठी आणि पर्यावरणासाठी परिवारातील प्रत्येका सदस्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी गाडी वापरणे योग्य नाही, त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.