चंद्रपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा भूमीपुजन सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द केला पुर्ण
 
 

चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे मंजूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम व परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा भूमीपुजन सोहळा आज संपन्न होणार आहे.
 
 
१६ ऑक्टोबर, २०१६ रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्दधर्मीय नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम व परिसराच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर भवनाचे बांधकाम व परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपुजन आज संपन्न होणार आहे.
 
 
या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आ. नानाजी शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा भाजपा गटनेते वसंत देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, मनपा सदस्य राहूल घोटेकर, सौ. छबुताई वैरागडे, सौ. शितल आत्राम, रवि आसवानी आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@