राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |



परभणी : राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी सरकार तयार असून त्यासाठी राज्य सरकार दिवसरात्र कार्य करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परभणी येथे विविध विकासकामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे हे देखील याठिकाणी उपस्थित होते.


परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या साडेतीन वर्षांत ७ हजार ९३१ कोटी रुपयांची कामे करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याच्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला असून जिल्ह्यातील ४५८ गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात २०१६ मध्ये एकूण २९५ पाणी टँकरच्या मार्फत पाणीपुरवठा केला जात होता, परंतु गेल्या साडे तीन वर्षांच्या काळात राज्य शासनच्या प्रयत्नांनंतर हा आकडा १० वर येऊन पोहचला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकरी कर्जमाफी योजना, शेतकरी वीजपुरवठा, पाणी पुरवठा अशा विविध योजनांच्या मार्फत करण्यात आलेल्या कामांविषयी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातील परभणीतील शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना श्रध्दांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.




दुकाने बंद झाल्यामुळे जातीचे राजकारण : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपमुळे सध्या अनेक जण बेरोजगार झाले आहेत. आपली राजकारणाची दुकाने बंद पडल्यामुळे अस्वस्थ झाल्यांकडून सध्या जातीचे राजकारण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने अशा अस्वस्थांकडे जास्त लक्ष देऊन नये, असा टोला गडकरी यांनी यावेळी लगावला. .

@@AUTHORINFO_V1@@