भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाने लाखो शेतकरी होणार भूमीस्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
जिल्हयातील दिड लाख खातेदारांना लाभ
  
राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
 
रुपांतरणासाठी शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम माफ
 


भंडारा : विदर्भातील भूमीधारी शेतकऱ्यांच्या जमीनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ फेबुवारी २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर आले असता दिला होता.
 
 
तुमसर येथील सभेत मुख्यमंत्री यांनी विदर्भातील अनिर्बंधित भूमीधारी शेतकऱ्यांना भूमीस्वामी मध्ये परावर्तीत करण्याची घोषणा केली होती. या संबंधीचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयामुळे विदर्भातील लाखो व भंडारा जिल्हयातील १ लाख १५ हजार १९ भूमीधारी शेतकरी कुटुंब आता भूमीस्वामी होणार आहेत.
 
 
यापूर्वी जमीनाचा धारणाधिकार बदलताना शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम व त्यासाठी करावा लागणारा अर्ज या बाबी रद्द करून थेट कायद्यात दुरुस्ती करून सर्व भूमिधारी जमिनी भूमी स्वामी धारणाधिकारामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मध्य प्रांतातील म्हणजेच आताच्या विदर्भातील भूमीधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे धारणाधिकार बदलून भूमी स्वामी करण्यासाठी राज्य शासनाने ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. या समितीची बैठक १८ एप्रिल २०१८ रोजी मंत्रालयात झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा समावेश होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@