परग्रहावर जीवन शोधण्यासाठी नासाची मोहीम आजपासून सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
‘ट्रांसपोर्टिंग एक्सोप्लेनेट सर्वे सॅॅटेलाइट’ अर्थात ‘टेस’ नामक उपग्रहाचे प्रक्षेपण आज अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने केले आहे. या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आज नासाने केले असून या उपग्रहाच्या माध्यमातून नासा नवीन ग्रहावर जीवन आहे काय याचा शोध घेणार आहेत. पृथ्वीच्या जवळ असणारे ग्रह आणि तारे यावर मानवी जीवन आहे काय याचा शोध या उपग्रहाच्या माध्यमातून नासा घेणार आहे.
 
 
 
 
 
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून हा उपग्रह अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी ६.५१ या वेळेवर अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला आहे. या उपग्रहाला स्वत:च्या कक्षेत प्रस्थापित होण्यासाठी ६० दिवस लागणार आहेत. त्यानंतर हा उपग्रह आपले कार्य सुरु करेल अशी माहिती नासाने दिली आहे. आपल्याला माहित नसणारे जग शोधण्याचा प्रयत्न हा उपग्रह करणार आहे.
 
 
परग्रहावर आपल्यासारखे जीवन आहे काय? असेल तर ते कसे असेल? आपण त्यांच्यासोबत संपर्क करू शकतो काय? ते आपल्यासाठी धोकादायक तर नसतील? अशा विविध प्रश्नांची उत्तर आपल्याला या उपग्रहाच्या माध्यमातून मिळू शकतात. ही मोहीम नासाची अतिशय महत्वाची मोहीम मानली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जगातील शास्त्रज्ञ या प्रश्नांवर उत्तर शोधत आहेत. आता काही प्रमाणात या प्रश्नांची उत्तर पृथ्वीवरील मानवी जगाला मिळू शकतात असे म्हणण्यास हरकत नाही. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@