अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी “रेड स्कॉड” पथकाची नेमणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
भंडारा जिल्हा पोलीस नागपूर परिक्षेत्रात अग्रेसर

 
 
भंडारा : पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी भंडारा जिल्हयातील लपून छपून सुरु असलेले सर्व प्रकारचे अवैद्य धंदे समुळ नष्ट करण्याकरीता भंडारा जिल्हा पोलीसांचे रेड स्कॉड या नावाने विशेष पथक तयार केले आहे. सदर पथक पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात २४ तास सक्रीयपणे कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे या पथकात नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची दर १५ दिवसांनी बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीसांवर नजर ठेवणारे अवैद्य धंदेवायिकांना अवैद्य धंदे करणे कठीण होणार आहे.
 
 
 
ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंद्यावर छापा मारला जाईल त्या पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. कोणत्याही अवैद्य धंदे, गैरव्यापाराविषयी काहीही माहिती असल्यास रेड स्कॉड पथकाशी संपर्क साधा. पथकाद्वारे तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी जनतेस केले आहे.
 
 
भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे अवैद्य धंद्याचे समुळ नष्ट करण्यासाठी वेळोवेळी विशेष पथकाद्वारे छापे मारण्यात येतात. भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अधिक्षक विनीता साहू रुजू झाल्यापासून भंडारा जिल्हयातील अवैद्यपणे सुरु असलेल्या जुगार, दारु, क्रिकेट सट्टा, अवैद्य रेती तस्कर, गांजा विक्री, देह व्यापार इत्यादी सारख्या अवैद्य धंद्यावर छापे मारुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचप्रमाणे चोरी, घर फोडी, खुन, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे करणारे गुन्हेगारांना सुध्दा तात्काळ गजाआड करण्यात भंडारा जिल्हा पोलीस हे नागपूर परिक्षेत्रात अग्रेसर आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@