पंतप्रधान मोदींचे स्वीडनमध्ये जंगी स्वागत

    17-Apr-2018
Total Views |

स्टॉकहोल्म : पाच दिवसीय युरोप देशांच्या दौऱ्यावर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यासाठी स्वीडन येथे पोहचले आहेत. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी स्वतः विमानतळावर जाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले, तसेच विमानतळाबाहेर स्वीडनमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भारतीय पंतप्रधानांचे स्वागत केले.
आज पहाटे पंतप्रधान मोदी हे स्वीडनमध्ये पोहोचले झाले. एअर इंडियाच्या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी स्टॉकहोल्म विमानतळावर दाखल झाले. यावेळी स्वीडिश पंतप्रधान लॉफवेन हे स्वतः याठिकाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी याठिकाणी उपस्थित होते. लॉफवेन यांच्यासह स्वीडन सरकारमधील काही प्रमुख अधिकारी देखील यावेळी पंतप्रधानांच्या स्वागता उपस्थित होते. पंतप्रधान मोदी विमानातून बाहेर आल्यानंतर लॉफवेन यांनी मोठ्या उत्साहाने मोदींना गळाभेट देऊन त्यांचे स्वागत केले.






स्वीडन पंतप्रधानांनी केले हिंदीमधून स्वागत :


 
दरम्यान यावेळी भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्वीडनमधील भारतीय नागरिकांनी देखील विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या नावे फलक लावून नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पंतप्रधान मोदी विमानतळाबाहेर बाहेर आल्यानंतर मोठा उत्साहाने भारतीयांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या नावाच्या घोषणा देखील दिल्या.

आपल्या युरोप दौऱ्यातील पहिल्या टप्प्याला पंतप्रधान आजपासून सुरुवात केली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे स्वीडन पंतप्रधानांची आणि स्वीडन राष्ट्रप्रमुखांची भेट घेणार आहेत. यावेळी लॉफवेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत. यानंतर येथे आयोजित करण्या आलेल्या इंडिया-नॉर्डिक परिषदेत सहभाग घेतील व त्यानंतर आपल्या ब्रिटेनच्या दौऱ्यासाठी रवाना होतील.