कोल्हापूर - मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

 
 
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत गेल्या सहा वर्षांपासून बंद पडून रखडलेली होती. मात्र अखेर कोल्हापूरकरांच्या प्रयत्नांना यश आले व अखेर आज दुपारी तीन वाजता एअर डेक्कन कंपनीच्या विमानाच्या टेकऑफने या सेवेची कोल्हापूरात सुरुवात झाली.
 
कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचे अनोख्या जल्लोषात स्वागत केले. मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या आजच्या पहिल्या विमानातून चक्क दिव्यांग मुले, कष्टकरी महिला,आणि विद्यार्थ्यांना प्रवास घडवून आणला गेला. दुपारी मुंबईतून १ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या विमानाने कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, क्रेडाई कोल्हापूरचे पदाधिकारी, हॉटेल मालकसंघ, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी अशा काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला. कोल्हापूरहून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी हेच विमान मुंबईकडे झेपावले. ज्यामधून हेल्पर्स ऑफ हँडीकॅप्ड, अंधशाळा, बालकल्याण संकुलातील प्रत्येकी दोन मुले, एकटी संस्था, महिला बचत गटाच्या दोन महिला, मुलांना आणि एका शेतकरी दाम्पत्याला प्रवासाची संधी मिळाली.
 
ज्यांनी कधीच विमानाने प्रवास केलेला नाही आणि केवळ आकाशात उडणारे विमान पाहण्यात समाधान मानणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आज प्रथमच विमान प्रवास घडला. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
@@AUTHORINFO_V1@@