ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन विम्याचे वेगळेपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018   
Total Views |
 
 
वयाच्या ६५ वर्षापर्यंत विमा कंपन्या पॉलिसी उतरवितात. त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कित्येक विमा कंपन्या पॉलिसी उतरवत नाहीत. पण, ज्यांची पॉलिसी अगोदरपासून अस्तित्वात आहे, अशांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करावेच लागते. ६० वर्षांच्या व्यक्तीसाठी विमा कंपन्याच्या ३६ योजना उपलब्ध आहेत, तर ७५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी १४ जीवन विमा योजना उपलब्ध आहेत.
 
वयोमान ६० वर्षांहून अधिक आहे, अशांना जीवन विमा पॉलिसीसाठी भरलेल्या प्रिमियमवर या आर्थिक वर्षी जास्त कर सवलत मिळणार आहे. यामुळे याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पॉलिसीची रक्कम वाढवा व जर तुमची आरोग्य विमा पॉलिसीच नसेल तर अवश्य काढून घ्या. जीवन विमा प्रिमियमवर आयकर कायद्याच्या ८० डी अन्वये कर सवलत मिळते. २०१७-१८ या आर्थिक वर्षापर्यंत जीवन विम्यासाठी प्रिमियम म्हणून भरलेल्या ३० हजार रूपयांच्या रकमेपर्यंत कर सवलत मिळत होती. चालू आर्थिक वर्षी ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रिमियमच्या रकमेवर कर सवलत मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षापर्यंत जीवन विमा पॉलिसी नसलेल्या व ८० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीस त्यांच्या वैद्यकीय खर्चावर कर सवलत मिळत होती. या आर्थिक वर्षापासून ही सवलत मिळण्यास सर्व ज्येष्ठ नागरिकांना पात्र करण्यात आले आहे.
 
या करसवलतीमुळे करपात्र उत्पन्न कमी होते म्हणजेच कर कमी भरावा लागतो. कररचनेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक कर भरावा लागतो, त्यांची १५ हजार ६०० रुपयांची करबचत होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षापर्यंत नऊ हजार २७० रुपयांची बचत होत होती. हॉस्पिटलचा झालेला खर्च, हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी औषधोपचार व वेगवेगळ्या शारीरिक चाचण्यांवर झालेला खर्च व हॉस्पिटलमधून घरी आल्यावर काही दिवसांसाठीचा औषधोपचारावरचा खर्च पॉलिसीधारकाला मिळतो. वयाच्या ६५ वर्षापर्यंत विमा कंपन्या पॉलिसी उतरवितात. त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कित्येक विमा कंपन्या पॉलिसी उतरवत नाहीत. पण, ज्यांची पॉलिसी अगोदरपासून अस्तित्वात आहे, अशांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करावेच लागते. ६० वर्षांच्या व्यक्तीसाठी विमा कंपन्याच्या ३६ योजना उपलब्ध आहेत, तर ७५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी १४ जीवन विमा योजना उपलब्ध आहेत.
 
काही विमा पॉलिसीत आजारपणांवर किंवा शस्त्रक्रियांवर एका कमाल मर्यादेपर्यंतच रक्क्म दिली जाण्याचा क्लॉज असतो. अशा वेळी वरील रक्कम पॉलिसीधारकाला भरावी लागते. काही काही विमा कंपन्या हॉस्पिटलच्या खोलीचे भाडेही पूर्ण देत नाहीत. ते उरलेले भाडे पॉलिसीधारकाला भरावे लागते. पॉलिसीत जर ‘को-पेमेंट क्लॉज’ असेल, तर खर्चाचा काही हिस्सा पॉलिसीधारकाला भरावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदा पॉलिसी काढताना या सर्व ‘क्लॉजेज’ची माहिती करुन घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांचे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे तसेच आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे विमा कंपन्या पॉलिसीत असे ‘क्लॉज’ टाकतात. ज्येष्ठ नागरिकांचा जास्त खर्च बाह्य रुग्ण उपचारांवर होतो व हा खर्च जीवन विमा किंवा ‘मेडिक्लेम पॉलिसी’त मिळत नाही.
 
मूळ ‘इंडेमनिटी’ पॉलिसी खरेदी करा. टॉप-अप योजना व फ्लोरर्स योजना निवडा. फ्लोरर्स पॉलिसी ही शक्यतो पती-पत्नी उतरवितात. समजा, एखाद्या पती-पत्नीची एक लाख रुपयांची फ्लोरर्स पॉलिसी आहे, तर पती व पत्नी कोणाच्याही आजारपणात १० लाख रुपयांपर्यंतचा दावा करता येतो. तसेच समजा, पतीला सात लाख रुपयांचा दावा संमत झाला असेल तर उरलेली रक्कम पत्नी आजारी पडल्यास, तिला संमत होऊ शकते. जीवन विमा कंपनीतर्फे सर्वच झालेला खर्च संमत होईल असे नाही. काही रक्कम स्वतःलाही भरावी लागते, म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी अशा आजारपणांसाठी काही रक्कम वेगळी गुंतवावी. ज्या ‘पॉलिसी’चे ‘रेटिंग’ ‘ए’ आहे अशाच पॉलिसी घ्याव्यात.
 
६० वर्षे वय व दहा लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी घ्यावयाची असेल, तर हे पर्याय चांगले आहेत. १) अपोलो मुनिच हेल्थ्‌स इझी हेल्थ स्टॅण्डर्ड, २) सिग्ना टीटीके हेल्थ्‌स प्रो. हेल्थ प्रोटेक्ट, ३) रेलिगेअर हेल्थ्‌स केअर ४) फ्युचर जनरलीज, हेल्थ टोटल, ५) आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल्स कम्प्लीट हेल्थ इन्श्युरन्स, ६) टाटा एआयजी जनरलीज मेडिप्राईस, ७) लिबर्टी जनरल्स हेल्थ कनेक्ट सुप्रीम
 
 
तर ७५ वय व १० लाख रुपयांचा विमा उतरविणार्‍यांसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत - १) आयसीआयसीआय लोम्बार्ड कम्प्लीट हेल्थ इन्श्युरन्स, २) रेलिगेअर हेल्थस केअर, ३) सिग्ना टीटीके हेल्थस प्रो हेल्थ प्रोटेक्ट.
 
विमा पॉलिसींचे रेटिंग तपासण्यासाठीच्या वेबसाईट www.livemint.com mintmediaratings2017  ज्या पॉलिसीत पैसे मंजूर न होण्याचे क्लॉज कमी असतात, दावे मंजुरीबाबत ज्या कंपन्यांच्या तक्रारी विशेष नसतात, दावे मंजूर करण्याचे प्रमाण जास्त असते, अशा कंपन्यांना ‘ए’ रेटिंग दिले जाते. ६५ वर्षांहून अधिक वय कसलातरी जडलेला आजार अशांच्या पॉलिसीत बर्‍याच मर्यादा घालण्यात येतात. काही काही पॉलिसी अशा आहेत की ज्या अगोदरपासून काढलेल्या आहेत व पॉलिसीधारक ज्येष्ठ नागरिक झाला की त्या वर्षापासून ‘पॉलिसी’त ‘को-पेमेण्ट क्लॉज’ समाविष्ट होतो. कित्येक विमा कंपन्या गुडघा पुनर्रोपण (नी रिप्लेसमेण्ट) शस्त्रक्रियेसाठी फक्त ५० हजार रुपये मंजूर करतात. पण, प्रत्यक्षात या शस्त्रक्रियेला लाख रुपयांहून अधिक खर्च येतो, त्यामुळे शस्त्रक्रियेच्या खर्चावर अशा तर्‍हेचे ‘कॅपिंग’ असणार्‍या पॉलिसी शक्यतो घेऊ नका.
 
पॉलिसी उतरविताना तुमच्या आरोग्याची स्थिती, विम्याचा प्रिमियम भरण्याची तुमची क्षमता व पॉलिसीत तुम्हाला काय समाविष्ट हवे? या बाबी तपासा/लक्षात घ्या. टॉप-अप प्लानला प्राधान्य द्या. या प्लानविषयीच्या अधिक माहितीसाठी https://bit.ly/293QTC9 ही वेबसाईट पाहा. हॉस्पिटलच्या बिलात पाच ते दहा टक्के रक्कम ‘इन्सिडेण्टल’ खर्च म्हणून आकारलेली असते. ही रक्कम विमा कंपनीतर्फे मिळत नाही. त्यामुळे आजारपणाच्या खर्चाची तरतूद म्हणून मुदत ठेवींमध्ये किंवा म्युच्युअल फंडांच्या अल्ट्रा-शॉर्ट टर्म फंडांत आणि लिक्विड फंडांत गुंतवणूक करावी.
 
 
 
 
- शशांक गुळगुळे 
 
@@AUTHORINFO_V1@@