मोबाईलनेच करा पार्किंगची बुकिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |
- रामदासपेठेत स्मार्ट पार्किंगसाठी नागपूर, 
 
स्मार्ट सिटीत नागपूरचा समावेश झाल्यानंतर शहरात सर्व काही स्मार्ट होताना दिसत आहे. तुली इम्पीरियल हॉटेलजवळ सेंट्रल बाजार रोड येथे मोबाईल बेस पार्किंग सुरू होत आहे. अर्थात वाहनधारकांना मोबाईलवरच पार्किंगची बुकिंग करता येणार आहे.
शहरात उंच इमारती उभ्या केल्या जात आहे. परंतु, पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वीच मनपाच्या सभेत पार्किंग धोरणांतर्गत शहरात आठ ठिकाणी पे अँड पार्क योजनेस मंजुरी देण्यात आली होती. यासोबतच पार्किंग शुल्क जास्त असल्याने प्रति एक तास व प्रति आठ तास या दरानुसार दर आकारण्यावर विचार करण्याचे संकेत दिले. स्मार्ट पार्किंगअंतर्गत रामदासपेठेत चारचाकी वाहनांसाठीही ही योजना राबविण्यात येणार आहे. दरम्यान, मॉल, चित्रपटगृह येथे आकारण्यात येत असलेल्या पार्किंग शुल्कावर आक्षेप घेत त्यांच्याकडून व्यावसायिक शुल्क आकारावे, अशी सूचनाही करण्यात आली.
 
मनपा कायदा १९४९ अंतर्गत शहरात पार्किंग धोरण लागू करण्यात आले. ६ ऑक्टोबर, २०१६ मध्ये मनपाने पार्किंग धोरणास मंजुरी दिली. त्यानुसार पार्किंगचे दर व मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट १९८८ अंतर्गत पार्किंगची जागा मंजूर करण्यात आली. या पार्किंग धोरणांतर्गत तीन झोनकरिता बेस दर म्हणून प्रस्तावित करण्यात आले होते. यानुसार शुल्क देऊन वाहन पार्किंग करण्याच्या दर निश्चितीस मंजुरी देण्यात आली. मोबिलिटी झोन अंतर्गत मेटड्ढो रेल कॉरिडोर आणि शहरांतर्गत हायवेवरील २४ मीटर रुंदी व त्यापेक्षा जास्त रुंदीचा यात समावेश करण्यात आला आहे.
‘बिझिनेस डिस्ट्रिक्ट ’ या दुसऱ्या झोनमध्ये व्यावसायिक परिसर, कोर सिटी परिसरात मोडणाऱ्या सीताबर्डी, इतवारी, लकडगंज, महाल, धरमपेठ, काँग्रेसनगर, गणेशपेठ आदींचा समावेश करण्यात आला, तर संमिश्र झोनमध्ये या दोन्ही झोनचा समावेश असलेला भाग वगळून इतर भागांचा समावेश करण्यात आला. यात निवासी व इतर संस्था, सार्वजनिक ठिकाणी आदींचा अंतर्भाव करण्यात आला. बेस दराच्या आधारावर पार्किंगच्या दर तासाप्रमाणे तसेच ऑफ स्ट्रीट व ऑन स्ट्रीट दर निश्चितीचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले. तर न्यायालय परिसरासमोर चारचाकी वाहनाकरिता प्रति दिवस २० रुपये व दुचाकींकरिता १० रुपये असा दर तसेच मासिक पाससाठी चारचाकी वाहनांकरिता २५० रुपये व दुचाकींसाठी १०० रुपये न्यायालय कामकाजाच्या एक तास अगोदर व एक तास नंतरच्या वेळेकरिता निश्चित करण्यात आले.
रामदासपेठेतील मोबाईल बेस पार्किंगमध्ये ६७ गाड्यांची व्यवस्था याठिकाणी राहणार आहे. वाहनचालकांना मोबाईलवरून वाहनांसाठी पार्किंग आरक्षित करता येईल.
@@AUTHORINFO_V1@@