साई संस्थानची मेयोला ३६ कोटींची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |


 
 
 
अत्याधुनिक उपकरणे येणार
साईबाबांची मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांमार्फत कृपा राशी नागपूर, 
 
मेयो रुग्णालयाच्या मदतीसाठी शिर्डीच्या साई संस्थानने ३६ कोटी २८ लाख रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत प्रत्यक्ष साईबाबांनीच कृपाप्रसाद दिला आहे.
नागपुरातील सर्वात पहिले रुग्णालय अशी मेयो रुग्णालयाची ख्याती आहे. १८६२ मध्ये सिटी रुग्णालय नागपूर शहरात सुरू झाले. १९०५ मध्ये त्याचे नामकरण मेयो रुग्णालय असे झाले. २०१४-१५ मध्ये एमसीआयची मान्यता मिळाल्यानंतर महाविद्यालय सुरू झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंदिरा गांधींचे नाव देण्यात आले.
 
शहर आणि जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांवर येथे उपचार होतात. तेथे मध्यंतरी सिटी स्कॅन आदी यंत्रे सुरू झाली असली तरी त्यांची कार्यक्षमता संपल्याने नवीन यंत्रांची गरज भासत होती. एमआरआय आदी यंत्रेही नव्हती. मेयोमध्ये उपकरणे नसल्यामुळे हजारो गरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक महिन्यापूर्वी तेथे ‘दीनदयाल थालीङ्कचे उद्घाटन झाले. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी यंत्रे व त्यासाठी निधीची गरज असल्याची बाब याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितली होती.
 
मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेतला. दरम्यान, शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घेऊन मेयो रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी ३५.२८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांनीही मेयोला निधी देण्यास सकारात्मक भूमिका घेऊन रुग्णांना दिलासा दिला आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांची सोय होणार आहे.
ही उपकरणे येणार
टेस्ला एमआरआय मशिन १२ कोटी, सिटी स्कॅन मशिन ७ कोटी, अ‍ॅन्जिओग्राफी मशिन ६ कोटी, हॉस्पिटल लाँडड्ढी प्लांट ६ कोटी, निवोनेटल व्हेंटिलेटर १५ लाख, मोठ्या रुग्णांना व्हेंटिलेटर १२ लाख, मल्टी पॅरा मॉनिटर २ लाख, सव्हो कंटड्ढोल वार्मर २ लाख, अ‍ॅडव्हान्स बायपॅप मशिन ३ लाख, यूएसजी मशिन ३६ लाख, ऑप्थॅलमिक मायक्रोस्कोप ५० लाख, असा एकूण ३५ कोटी २८ लाख रुपये निधी खर्च होणार आहे. ही उपकरणे कोणत्याही स्थितीत बंद राहू नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी अधिष्ठात्यांवर सोपविण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@