भाजपाचा कडकडीत उपवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2018
Total Views |


 
 
- काँग्रेसी ‘पोट’पूजेचे धिंडवडे
- गोंधळी खासदारांचाही समाचार
- खा. विकास महात्मे अग्रभागी
- बावनकुळेंच्या हस्ते लिंबूपाणी
नागपूर, 
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी एकच गोंधळ घालून, तब्बल तीन आठवडे कामकाज ठप्प केले. यामुळे संसदेच्या कामकाजावरील कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला. याच्या निषेधार्थ भाजप खासदारांनी अधिवेशनादरम्यानचे भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, खा. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात गुरुवारी संविधान चौकात दिवसभर उपवास आंदोलन केले. या आंदोलनाला धार असल्याने दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने उगारलेले उपवासाचे अस्त्र म्यान झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
 
 
 
देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याच्या तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची धार बोथट झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी पोटभर छोले भटुऱ्यांवर ताव मारून, एक दिवसाचा उपवास पाळला. खरे तर दिल्लीत तीन तास विलंबाने सुरू झालेल्या आंदोलनाची हवा काँग्रेस नेत्यांनी केलेल्या ‘पोट’पूजेमुळे निघून गेली. त्यामुळे भाजपाच्या उपवास आंदोलनाविषयी जनतेमध्ये उत्सुकता होती. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणीही आहार घेऊन उपवास करू नये, अशी ताकिद दिली होती. त्यामुळे भाजप कार्यकत्र्यांनी दिवसभर कडकडीत उपवास केला. शहर भाजपतर्फे गुरुवारी सकाळी १० वाजता उपवास आंदोलनाला प्रारंभ झाला. प्रारंभी खा. विकास महात्मे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
 
 
 
उपवास आंदोलनात भाजप शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, भाजपचे प्रवक्ते आ. सुधाकरराव देशमुख, आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सागर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिप अध्यक्षा निशा सावरकर, माजी खा. अजय संचेती, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, माजी स्थायी सभापती संदीप जाधव, विधि समिती सभापती धर्मपाल मेश्राम, परिवहन सभापती बंडू कुकडे, सुभाष पारधी, अर्चना डेहनकर, किर्तीदा अजमेरा, भोजराज डुंबे, किशोर पालांदूरकर, अविनाश धमगाये, प्रमोद पेंडके आणि सर्व विभागांच्या अध्यक्षांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये नेत्यांनी काँग्रेसच्या वर्तणुकीची लक्तरे वेशीवर टांगली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला देशातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नेत्यांनी दिला.
महापालिकेत भाजपाचे १०८ नगरसेवक आहेत. यापैकी काही नगरसेवकांनी उपवासाला दांडी मारली. त्यांना अनुपस्थितीचे स्पष्टीकरण विचारण्यात येईल, असे शहराध्यक्ष आमदार कोहळे यांनी सांगितले.
केवळ पाण्याची व्यवस्था
संविधान चौकातील उपोषणमंडपात फक्त पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था होती. एरव्ही संविधान चौकात हमखास असणाऱ्यां चहावाल्यानेही गुरुवारी टपरी लावली नव्हती. तर पोलिसांनी परिसरात कोणत्याही खाद्य पदार्थ विकणाèया गाडीवाल्याला प्रवेश दिला नाही.

लिंबूपाणी पिऊन उपवासाची सांगता
भाजपने संविधान चौकात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळात उपवास आंदोलन केले. या दरम्यान नेत्यांसह कार्यकत्र्यांनी कडकडीत उपवास केला. आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू नये, याची पुरेपूर काळजी नेत्यांनी घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खा. विकास महात्मे व सहकाऱ्यांनी लिंबू पाणी पिऊन उपवासाची सांगता केली.
गडकरी, फडणवीस
अभिवादन करणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, १४ एप्रिलला सकाळी ९ वाजता संविधान चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@