मराठा समाजाच्या स्थितीबाबत मागासवर्ग आयोग घेणार सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

अमरावती येथे आज करणार जनसुनावणी




अमरावती:
मराठा समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या स्थितीविषयी राज्य मागासवर्ग आयोग आज सुनावणी करणार आहे. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळेत ही जनसुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने आयोगाची आजची सुनावणी एका दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. यासाठी आयोगाचे इतर सदस्य तसेच राज्यातील काही सामाजिक संस्था देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात विभागवार जनसुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलित‍ करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. या सर्व माहितींच्या आधारेच मराठा समाजाच्या सद्यस्थितीवर आयोग सुनावणी करणार आहे.
अमरावती महसूल विभागांतर्गत ज्या व्यक्ती, संस्था, संघटनांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासंबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे किंवा आपले म्हणणे मांडावयाचे आहे अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक माहितीसह १२ एप्रिलला आपले निवेदन अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहातील सभागृहात सादर करावे, असे आवाहन आयोगाच्या सदस्य सचिवांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी गेल्यावर्षी राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते. यावेळी आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. परंतु यावर सरकारने सहमती दर्शवण्यापलीकडे आतापर्यंत काहीही केलेले नाही. दरम्यान न्यायालयात याविषयी काही पुरावे राज्य शासनाने सादर केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु यावर आणखी कसली ठोस निर्णय अथवा माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आयोगाची आजची सुनावणी एका दृष्टीने मराठा समाजासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे,
@@AUTHORINFO_V1@@