आंबेडकर जयंतीदिनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018
Total Views |

जिल्हा पोलीस अधिक्षक शशी कुमार मीना यांचे आवाहन




बुलडाणा : येत्या शनिवारी डॉ. बाबासराहेब आंबेडकर यांची १२७ वी जन्मजयंती आहे. त्यामुळे ही जयंती सर्वदूर शांततेत साजरी करण्यात यावी. तसेच जयंती दिनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवत उत्साहपूर्वक वातावरणात शांततेने जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलीस आणि नागरिकांवर सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. नागरिकांनी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने प्रयत्न करावेत, तसेच शांत आणि उत्साहात जयंती साजरी करावी, असे मीना यांनी म्हटले.
तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत मीना यांनी पोलीस अधिकाऱ्यांना देखील काही निर्देश दिले. पोलीसांना दिलेल्या कामगिरी चोखपणे पार पाडावे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीसबल तैनात करावे. जिल्ह्यात सर्वत्र शांतता व उत्साहाने जयंती साजरी करण्यासाठी परिस्थिती निर्माण करून द्यावी. जिल्ह्यातील संवेदनशील गावांमध्ये पोलीसांनी महत्वाची भूमिका पार पाडत कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी. त्याचप्रमाणे अन्य विभागांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@