जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018
Total Views |


वाशीम : दक्षिण भारतात काही ठिकाणी आपली हजेरी लावल्यानंतर आता अवकाळी पावसाने विदर्भात देखील हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्याच्या भरदिवसांमध्ये काल अचानकपणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे वाशीमकरांची चांगलीच धांदल उडाली.
काल दुपारपर्यंत जिल्ह्यातील वातावरण सामान्य होते. परंतु दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार वादळी वारा सुरु झाला. तसेच वातावरण देखील ढगाळ होण्यास सुरुवात झाली. काही वेळानंतर रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. थोडा वेळ रिमझिम सरी पडल्यानंतर अचानकपणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतात आणि रस्त्यार काम करत असलेल्या नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. काही काळानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात संपूर्ण शहरामध्ये पाणीपाणी झाले. तसेच अनेक ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित झाला. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आज सकाळी देखील जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. स्कायमेट या संस्थेकडून आज देखील जिल्ह्यात काही ठिकाणी पावस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@