खंबाटकी घाटात भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 

सातारा :
साताऱ्याहून पुण्याकडे येत असलेल्या एका ट्रक आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना तातडीने उपचारासाठी सातारा आणि वाईकडे हलवण्यात आले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साताऱ्याहून काही नागरिकांना घेऊन एक आयसर ट्रक (केए३७ ६०३७) पुण्याच्या दिशेने येत होता. आज पहाटे खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर अचानकपणे ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रकला भीषण अपघात झाला. यामध्ये पाठीमागे तसेच समोर बसलेल्या एकूण १८ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. यामध्ये काही महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघात झाल्यानंतर रस्तावरून जाणाऱ्या इतर प्रवाश्यांनी तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच स्थानिक पोलिसांना देखील पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@