पेपरच्या काळात झेरॉक्स मशिन सुरू4 जणा विरूध्द गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |
 
 
पेपरच्या काळात झेरॉक्स मशिन सुरू
 
4   जणा विरूध्द गुन्हा दाखल
नंंदुरबार, 9मार्च
पेपरच्या काळात झेरॉक्स मशीन बंद ठेवण्याचे आदेश असतांना झेरॉक्स मशीन सुरू ठेवून उत्तरांच्या झेरॉक्स काढल्या म्हणून  ४ जना विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
10 व 12 वीच्या परीक्षेला पेपरच्या वेळेत झेरॉक्स मशीन बंद ठेवावे असा जिल्हाधिका­यांचा आदेश आहे. असे असतांना शहादा शहरातील म्युनिसीपल हायस्कूल येथे 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असतांना पुरूषोत्तम मार्केट येथील महेंद्र पटेल यांचे कल्पेश झेरॉक्स हे पेपरच्या कालावधीत सुरू ठेवण्यात आले.सचिन चौधरी याने पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे झेरॉक्स करून ती मिळून आली.दिलीप भावसार आणि राजेश पाटील यांच्या खिशात उत्तरांच्या झेरॉक्स प्रति मिळून आल्या. म्हणून दिपक भोई, पो.ना.शहादा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून शहदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि ए.के.नेरकर करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@