वाचकालय

    08-Mar-2018
Total Views |





देवधररुपी नररत्न


वा रे वा ! पुणेकर कष्टाळू असल्याचा शोध आता लागला हे ही नसे थोडके. दुपारी १ ते ४ बंदची सवय असली तरी ते कष्टाळू नाहीत, असे कधीच कुणी म्हटले नव्हते. असो. यामध्ये बहुतांचे कष्ट उदरनिर्वाहाकारणे प्रामाणिक प्रयत्न करून दुसर्‍याचे हितही पाहतात, तर काही लोकांचे कष्ट केवळ स्वार्थ साधून दुसर्‍याचे बळकावण्यातही असतात. अशा लोकांची ओळख आता लोकांना झाली आहे. वरील संदर्भ त्रिपुरात कार्यरत असलेल्या सुनील देवधरांबद्दल असल्याने स्पष्ट करावेसे वाटते की, पुणेकर म्हणून त्यांचे कोणी नाव घेतलेले स्मरत नाही. मात्र, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांची ओळख येथील स्वयंसेवकांना व त्रिपुरातील जनतेला आहे.गेली २५ वर्षे सातत्याने तेथील जनतेची नि:स्वार्थ सेवा करण्यात संघ कार्यरत आहे. स्वत:च्या घरावर वैयक्तिक आशाआकांक्षाना तिलांजली देऊन केवळ भारतमातेसाठी देशाच्या कोणत्याही भागात जाऊन स्वेच्छेने कामकरणार्‍या प्रसिद्धीपराङ्‌मुख अशा असंख्य स्वयंसेवकांपैकी एक नररत्न म्हणजे सुनील देवधर. संघाच्या कामात पुणेकर, मुंबईकर, जातपात याला थारा नसतो. चुकुनसुद्धा कुणी बोलत नाहीच, पण आचरणातही दिसणार नाही. सर्वच स्वयंसेवक केवळ कष्टाळू नव्हे, तर परमकष्टाळू व देशहित हे सर्वस्व मानून जीवनाची आहुती द्यायला तयार असतात. हे सर्व समजायला संघातच जायला हवे. देशासाठी जे अशी कामे करतात त्याला आयुष्याची ही मर्यादा नसते. आपले स्वतःचे सुभे सांभाळण्यात व दुसर्‍यांचे हित साधण्याच्या नावाखाली येनकेनप्रकारेण भावी पिढ्यांसाठी मिळकत करून ठेवतात. त्यांना देवधरांचे नाव कसे भावले, या नवलकथेचा रोख कळेलच.

- सदानंद भावे,
डोबिंवली
00000000000000000000000000000000000

एक पुतळाच तर पाडलाय ना !


’एक पुतळाच तर पाडलाय ना!’ हा दै. ‘मुंबई तरुण भारत’मधील (७ मार्च) अग्रलेख त्रिपुरातील डाव्यांना आरसा दाखविणारा आहे. फक्त त्रिपुराच नव्हे तर जिथे जिथे डाव्यांची सत्ता होती/आहे, तिथे संघ स्वयंसेवकांच्या व भाजप कार्यकर्त्यांच्या उठसूठ हत्या केल्या जात होत्या. त्या योग्य होत्या? विरोधकांशी हिंसक वागणे हे डाव्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यांनी एक पुतळा पाडला म्हणून गळा काढणे अपेक्षेप्रमाणे असले तरी त्यांना शोभत नाही, हे नक्की! लेनिनच्या गावात तो हद्दपार झाला आहे, साम्यवादी विचारसरणीलासुद्धा घरघर लागली आहे. अशात भारतातील लोकशाही मूल्यांचा गैरफायदा घेणारे हे डावे व्यावसायिक रूदाली आहेत. ज्यांना त्यांचा पराभव पचविता आलेला नाही. तुम्ही जसे वागणार तसेच उत्तर तुम्हाला मिळणार, हे तत्त्व डाव्यांनी विसरू नये.
- माया भाटकर,
चारकोप गाव
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.