कारागृहात आत्महत्त्येचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
कारागृहात आत्महत्त्येचा प्रयत्न
नंदुरबार, 7 मार्च
नंदुरबार जिल्हयातील कारागृहात कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रायदास गुज­या पावरा रा.छिनालकुवा, बारीपाडा ता. धडगाव हा भाग 5 गु.र.नं. 36 / 2018 भादवि कलम 309 प्रमाणे बंदी आहे. त्याने 5 रोजी जिल्हाकारागृहातील बॅरेक क्र. 7 मध्ये संडासाच्या खिडकिला रात्री 10. 45 वाजेच्या सुमारास चड्डी पॅन्डच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून पो.कॉ.जेलरक्षक अशोक नाईक यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पेालीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वसावे करत आहे.रायदास पावराने कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न का ? केला याचे कारण अद्याप समजु शकले नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@