केतन रघुवंशी यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
केतन रघुवंशी यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
 
नंदुरबार, 7 मार्च
खोटया गुन्हयात अडकविण्यात आले असून त्याची चौकशी करावी असे उपोषणकर्ते केतन रघुवंशी यांनी पोलीस अधिक्षक नंदुरबार यांना बुधवार रोजी निवेदन दिले आहे.
 
 
केतन रघुवंशी यांनी शिवजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा फलक लावला होता. या फलकावर शिवाजी महाराज हे अफजल खानाचा वध करतांनाचे चित्र होते. तसेच आतंकवाद असाच संपवतात असे विधान होते. 5 रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.चव्हाण यांनी भादवि कलम 353 प्रमाणे केतन रघुवंशी यांच्यावर कारवाई केली. त्यांनी केलेले आरोप खोटे , हेतुपुरस्सर, व सुढबुध्दीचे आहेत. जिल्हयातील अवैध धंद्यांना वाचा फोडल्याने, अवैध गो हत्या व तस्करी आदी मांडतांना शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.बुधवंत यांच्याशी झालेला वाद व अनेक कारणांमुळे आपल्या विभागाने चार वेळा खोटया गुन्हयात कारागृहात डांबले व तडीपारीची नोटीस दिली.माझ्यावर झालेल्या अन्याविरूध्द काम थांबविले नाही. ज्या शिवरायांनी उभा महाराष्ट्र घडविला त्यांच्या फलकाचा व शौर्याचा उपहास करीत बॅनरची रितसर परवानगी असतांना देखील पोलीसांनी अवैधरित्या बळजबरी फलक काढून नेला. व माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या जाचाला कंटाळून व शिवाजी महाराजांच्या अपमानापोटी 5 मार्च पासून पोलिस कोठडीत केतन रघुवंशी यांनी अन्नत्याग केला आहे.
 
 
बुधवार रोजी त्यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लावणे गुन्हा असेल तर पोलिस अधिक्षकांनी तसे लेखी द्यावे.गुन्हा नसल्यास तसेही लेखी द्यावे. गुन्हा नसल्यास महाराष्ट्रात आजतागायत अफजल खान वधाच्या बॅनर वरून जेवढे गुन्हे दाखल असतील तेवढे मागे घ्यावेत.नंदुरबार शहरातील पोलिसांनी अवैधरित्या काढलेले बॅनर पूर्ववत त्याचठिकाणी एक दिवसासाठी लावावे. दोषी अधिका­यांवर कारवाई करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@