दुसऱ्या टप्प्यात ९६ हजार बालकांना पोलीओचा डोज – जिल्हाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
पल्स पोलीओ लसीकरण मोहिम 
११ मार्च रोजी दुसरा टप्पा
 

भंडारा : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेकरीता पहिल्या टप्प्याची आरोग्य विभागाने जिल्हयातील ९६ हजार ५४० बालकांना पोलीओची लस देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे योग्य नियोजन करुन पोलीओ लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीओ लसीकरण आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात एकूण १०२२ लसीकरण केंद्र कार्यरत राहणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी व विटभट्टया, उस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, भटकी जमात, बांधकाम सुरु असलेली ठिकाणामधील जोखमीच्या भागातील लाभार्थी असे एकूण ९६ हजार ५४० बालकांना या मोहिमेमध्ये लस देण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्याकरीता २ हजार ४४३ कर्मचारी व अधिकारी विविध भागात कार्यरत राहणार आहेत. बुथवरचे काम आटोपल्यानंतर शहरी भागात ५ दिवस व ग्रामीण भागात ३ दिवस पी.पी. आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलीओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखाली सर्व बालकांना पोलीओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २१ वर्षे सातत्याने पोलीओ निर्मुलनाकरीता आपण सर्वजन योगदान देत आहात, आपल्या अथक परिश्रमामुळेच भारतामध्ये १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळेच भारताला पोलीओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळाले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@