शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार- मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |

 
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, अजूनही कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे व्यक्त केले.
 
 
लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील २६२ कोटी रुपयांतून १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान या योजनेला लोकसहभागातून चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील तीन वर्षात ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल झाला आहे. पूर्वी केवळ एकच पीक शेतकरी घेत असे आता तोच शेतकरी दोनदा पीक घेत आहे. या योजनेत लोकसहभाग हा देखील महत्वपूर्ण ठरला आहे. लोकसहभागातून सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे. पूर्वी पब्लिक–प्रायव्हेट-पार्टनरशिप (PPP) असे मॉडेल होते. परंतू आता शासनाने ‘पब्लिक-प्रायव्हेट-पिपल्स- पार्टिसिपेशन’ हे मॉडेल सुरू केले आहे. या मॉडलेमध्ये लोकांचा सहभाग हा महत्वपूर्ण असा ठरणार आहे. यापुढे जलसंधारणाच्या कामांसाठी एखाद्या समूहाने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ४५ टक्के निधी गुंतवल्यास उर्वरित ५५ टक्के निधी शासन गुंतवणार आहे. या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन ग्रामविकास साधला जाणार आहे. मागील तीन वर्षांत २५ हजार गावे दुष्काळाने होरपळली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे त्यात टप्या-टप्याने घट झाली आहे. जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेने दुष्काळमुक्तीबरोबरच रोजगार उपलब्धीवरही भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@