वाघोदा पुलावर दोन ट्रकची समोरा समोर धडक.चुकीच्या बाजुने वाहन चालवणे बेतले जीवावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
वाघोदा पुलावर दोन ट्रकची समोरा समोर धडक.चुकीच्या बाजुने वाहन चालवणे बेतले जीवावर
 
डांभूर्णी, ता.यावल : येथून जवळच असलेल्या गिरडगाव वाघोदा ता.यावल येथे रवीवारी  सकाळी 10 वाजेच्या सुमारास मिठाच्या गोण्या भरलेला लोडींग ट्रक  क्र एम.एच. 11 एम.4039 चोपड्याकडून यावल कडे जात होता.   गिरडगावच्या व वाघोद्याच्या मध्ये सा.बा.विभागाने बांधलेल्या दोन पुलांवर येणारे व जाणार्या वाहनांसाठी दिशा दर्शक फलक नसल्याने चोपड्याकडून यावलकडे जाणारा ट्रक चालकाने आपला ट्रक चुकिच्या दिशेने घातल्यामुळे यावल कडून चोपडा कडे जाणारा काचेने भरलेला ट्रक क्र सि.जी.04 जे.डी.5795हा समोरुन येताच त्यांच्यात समोरा समोर धडक झाली.
 
       यात चोपडा येथील  ट्रक क्र एम.एच. 11 एम.4039 चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.त्यासोबत असलेले सहकारी ब जखमी आसल्याने  उपचारासाठी जळगाव रुग्णायात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती गिरडगाव पोलीस पाटील अशोक पाटील यांना कळताच त्याःनी घटनेस्थळी भेट देऊन त्यांनी यावल पोलीस स्टेशनला कळविले.  जखमिंना  रुग्नालयात दाखल करण्यासाठी जमलेले नागरिकांसह वाहन धारक यांनी मदत केली एस.टी.चालक रहिमान खाटीक भंगारवाले यावल,साकळी उपसरपंच वसिम खान आसिफ खान,साहेबराव बडगुजर,दिपक पाटील,नितीन फन्नाटे,बाळकृष्ण तेली,दहिगाव उपसरपंच देविदास धांगो पाटील,वाघोदा चंदु पाटील,सुधाकर पाटील,नितीन पाटील,याच्यासह ग्रामस्थांनी मदत व सहकार्य केले .
 
@@AUTHORINFO_V1@@