विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे कल वाढवावा - नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नाविन्‍यपूर्ण व संशोधानात्‍मक शिक्षणावर भर देण्‍याची आवश्‍यकता – सुधीर मुनगंटीवार
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गोंडवाना विद्यापीठाचे खरे शिल्‍पकार – कुलगुरू डॉ. कल्‍याणकर
 
गोंडवाना विद्यापीठाचा ५ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्‍न
 


गडचिरोली : निसर्गाने संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठीतरूणांच्या हाती रोजगार असणे आवश्यक आहे. त्याकरीता गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायभिमुख शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर पारंपारिक शिक्षण पध्‍दती ऐवजी नाविन्‍यपूर्ण व संशोधनात्‍मक शिक्षणावर भर देण्‍याची आवश्‍यकता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली.
 
 
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या पाचव्या दिक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गडचिरोली जिल्हा हा निसर्ग संपन्न असलेला श्रीमंत जिल्हा आहे. मात्र बेरोजगारी, गरिबी यासह विकासात्मक मागासलेपण या प्रमुख समस्या या ठिकाणी आहे, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, या जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे सर्वतो‍परी प्रयत्‍न सुरू आहेत. कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा शिक्षण, उद्योग व शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. शिक्षण हा विकासाचा महत्वाचा गाभा असून त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची आहे.
 
 
तरूणांच्या हाती केवळ पदव्या आल्याने कुठल्याही जिल्ह्याचा विकास होत नाही, तर त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा समाज व जिल्ह्याच्या विकासासाठी कसा उपयोग होतो, यावर अवलंबून आहे. उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त करूनही अनेक तरूण बेरोजगार आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना व्यवसायभिख शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. 
 
 
गडचिरोली जिल्ह्यात रोजगार वाढविण्यासाठी शेतीच्या विकासाबरोबरच उद्योग येणेही आवश्यक आहे. उद्योग आणण्याकरीता सरकार प्रयत्नशील असून त्याकरीता गडचिरोलीतील नागरिकांनी डाव्या विचारसरणीला थारा न देता विकासात्मक विचारांना साथ देण्याची आवश्यकता आहे. हा विकास करतांना जिल्ह्यातील जल, जंगल व जमीन यांचा समतोल साधण्याची गरज आहे. असेही नितीन गडकरी यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@