नवी दिल्ली : नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे पुढील महिन्यात दोन दिवसीय भारत भेटीवर येणार असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. नेपाळच्या पंतप्रधान निवड झाल्यानंतर ओली यांची ही पहिलीच अपौचारिक भारत भेट आहे. त्यामुळे या भेटीत भारत-नेपाळ यांच्यात द्विपक्षीय चर्चा देखील होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
येत्या ६ ते ८ एप्रिल दरम्यान ओली हे भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी राधिका शाक्य ओली आणि नेपाळचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. आपल्या भेटी दरम्यान ओली हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची देखील भेटी घेणार आहेत. पंतप्रधान मोदींशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून यावेळी दोन्ही देशांमध्ये काही नवे करार होण्याची देखील वर्तवली जात आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक वर्षांचे ऐतिहासिक संबंध आहेत. भारताने नेहमी संकटकाळी नेपाळला मदत केली आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध आणखीन दृढ झाले आहेत. तसेच भविष्यात देखील हे संबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये ओली यांचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओली सरकार बरोबर काम करण्याचा आपला मानस बोलून दाखवला होता. त्यामुळे ओली यांची ही भेट दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असे देखील परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतने ओली सरकारबरोबर देखील तितक्याच याचा फायदा होईल. यासाठी नेपाळ सातत्याने प्रयत्न करत आहे, असे मत ओली यांनी व्यक्त केले आहे. तसेच आपली भारत भेटी नेपाळसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.