दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी खान्देश शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
 

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी खान्देश शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
शिष्टमंडळात जळगावचे चौघे : एसआयटी स्थापन
जळगाव : दोंडाईचा येथिल बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी खान्देशातील तेली समाजाच्या लोकप्रतिनिधी व समाज पदाधिकारयायांनी ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच महिला व बालविकासमंत्री ना. पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन त्यांचेसोबत चर्चा केली.
 
विधानभवनात या दुर्दैवी घटनेबाबत बालिकेला न्याय मिळावा म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे, ना.जयकुमार रावल, ना.गिरीष महाजन, आ.जयदत्त क्षिरसागर, आ.शिरीष चौधरी, भाजपा ओबीसी. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी,माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, झेप फाऊंडेशन च्या अध्यक्षा रेखा चौधरी, धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, गटनेत्या प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांच्या समवेत बैठक झाली याप्रसंगी बालिकेच्या कुटुंबीयांनी घटनेविषयी माहिती दिली. त्यामुळे तातडीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विनॉयकुमार चौबे यांना तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.या पथकात सहा पोलिस अधिकारी परजिल्ह्यातील असतील अश्याही सुचना देण्यात आल्या.
 
खान्देशातील तेली समाजाच्या या शिष्टमंडळात धुळे , नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव, अमळनेर, भुसावळ शहरातील समाज बांधवांत जळगावातुन तेली समाज शि. प्र.मंडळ सदस्य महेश चौधरी, महानगर प्रसिद्धी प्रमुख दुर्गेश चौधरी,सुनिल चौधरी, प्रशांत सुरळकर यांचा समावेश होता.

@@AUTHORINFO_V1@@