जळगाव, 28 मार्च :
संभाजीराव भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदूसमाजातर्फे बुधवार रोजी सकाळी 11 .30 वाजेच्या सुमारास शिवतिर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकायांना निवेदन देवून मोर्चाची सांगता झाली.
1 जानेवारी रोजी कोरेगांव भीमा येथील वातावरण ज्या गोष्टीमुळे चिघळले तो गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक कोणी लावला ? त्यामागे हेतु काय होता याची सखोल चौकशी व्हावी. 3 जानेवारी रोजी महाराष्ट्रात जो बंद पुकारला गेला त्यानंतर येथे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यास अॅड.प्रकाश आंबेडकर हे जबाबदार आहेत.पुणे येथे जी एल्गार परिषद झाली तीचा संबध देशविघातक चळवळीशी होता हे स्पष्ट झाले आहे.3 जानेवारी रोजी मुंबई येथे जे कोंबींग ऑपरेशन झाले त्याचा खुलासा सरकारने करावा. भिडे गुरूजी हे वढु बुद्रुक येथे 1 जानेवारी ला येणार असून त्यांची सभा होणार आहे अशी अफवा सोशल मिडीयावर पसरवणायांची सखोल चौकशी व्हावी. वढू बुद्रुक येथे कादीरखान नावाचे बनावट आधारकार्ड सापडले हा गंभीर विषय असून दंगलीच्या दृष्टीने त्याचाही तपास व्हावा. राहुल फटांगडे या तरुणाचा निर्घृण खून झाला त्याच्या मारेकयांना व मारेकयांना उत्तेजना दिली अशा लोकांवर गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी. खोटी फिर्याद दाखल करणाया फिर्यादी महिलेची सखोल चौकशी करावी.
संभाजीराव भिडे गुरूजींवरील तथाकथीत गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावेत. मिलींद एकबोटे, धनंजय देसाई व विरेंद्र तावडे यांना केवळ संशयापोटी कारागृहामध्ये ठेवण्यात आले आहे त्यांची मुक्तता करण्यात यावी. 3 जानेवारी रोजीच्या दंगलीत राज्यात वातावरण चिघळून निघाले समाजाचे प्रपंच आर्थिक नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अॅड.प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांकडून वसुल करावी. ही नुकसान भरपाई सरकारने करून नये. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मोर्चाचे ठळवैशिष्टे - 1) जिल्हाभरातुन धारकरी सहभागी 2) मोर्चात बजरंगदल, विहिप, सनातन संस्था व हिंदूत्ववादी संघटनांचा सहभाग 3) शांततेत मोर्चाची सांगता. 4) मोर्चामुळे रहदारीस अडथडा होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी धारकयांनी घेतली.