जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे आज होणार मूल्यमापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |
 
 
 
वाशीम : सन २०१६-१७ या वर्षातील वाशीम जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे मूल्यमापन करण्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक आज जिल्ह्यात बाह्य मूल्यमापनासाठी येणार असून जिल्ह्यातील तंटामुक्त गावांची पाहणी करणार आहे, तसेच त्याचा अहवाल तयार करून पोलीस अधिक्षक आणि राज्य सरकारकडे पाठवणार आहे.

या पथकामध्ये हिगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे, सेनगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, हिंगोली पंचायत समितीचे सभापती विलास काठमोडे आणि पत्रकार सुधीर गोगटे यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चाबरीया यांनी गठीत केलेल्या या समितीला हिंगोल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील मान्यता दिली आहे. हे पथक वाशीममधील मनोरा, कारपा, मंगळूरपीर आणि धनज या तालुक्यांमधील काही गावांची पाहणी करणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@