माणसाच्या घरावरती चिमण्यांची वसती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |
 
 
- काऊ ये, चिऊ ये, दाणा खा, पाणी पी अन्‌ भुर्रकन्‌ उडून जा
चिमण्या आणि कावळे यांच्याशी माणसाचे प्राचीन काळापासून नाते आहे. माणूस त्यांना दाणा देतो, पाणीही देतो... मग मात्र भुर्रकन्‌ उडून जा, असेही म्हणतो. चिमण्यांना खरेतर माणसांच्या घरांत घरटी बांधायला आवडते. माणसांनी त्यांच्याशी दुरावा साधल्यापासून चिमण्यांच दिसेनाशा होत आहेत. कारंजा येथील नरेंद्र खाडे यांच्या घरी मात्र शेकडो चिमण्यांचा बिबधास्त वावर आहे.
खाडे मूळचे कारंजा रहिवासी आहेत. मानोरा पोलिस स्टेशनला पोलिस नायक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पोलिस समाजाचे मित्र असावेत, असे म्हणतात, नरेंद्र वसंतराव खाडे यांनी त्याही पलिकडे जावून चिमण्यांशीच मैत्री केली आहे. शेकडो चिमण्यांनी त्यांच्या घरावर कब्जाच केला आहे. त्यांच्या घरांत आणि अंगणातही असंख्य चिमण्यांची घरटी आहेत.
 
 
नरेंद्र यांनी सिद्धेश्वर नगरात ड्युपलेक्स पद्धतीचे घर बांधले त्यावेळी चिमण्यांनी 25 फुट उंचीवर घरटे तयार केले होते. त्यातून अंडी व चिमण्यांची पिले खाली पडत. ते बघून खाडे कळवळले. त्यांनी यावर उपाय शोधला. मुलांच्या शालेत न्यायच्या बास्केट चक्क खिडकीला बांधल्या आणि गंमत म्हणजे दोनचं दिवसात चिमण्यांनी त्यात संसार थाटला. याच काळात त्यांची पत्नी किरण, मुलगी भूमी व मुलगा क्षितीज यांनी चिमण्यांना खाण्यास धान्य व पिण्यास पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे चिमण्या व इतर पक्ष्यांचा राबता वाढत गेला. पक्ष्यांची किलबिल वाढली. आता तर रोज नवे नवे पक्षी यायला, बसायला लागले. पाहुणचार घ्यायला लागले. आपल्यासोबत रोज नव्या पाहुण्यांना घेवून यायला लागले. चिमणी, कावळा, साळुंखी, मैना, सूर्यपक्षी, कोतवाल... अशा विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्यांचे घर दरवळत असते.
 
वाढती जंगलतोड, मोबाईल मनोरे, वणवे, सिमेंटची घरे यांनी पक्ष्यांचा निवारा गिळंकृत करून टाकला आहे. आज झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे. बैठी घरं जाऊन उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत. वाढते शहरीकरण, वृक्षतोड, प्रदूषण या जुन्या समस्यांसोबत मोबाइल टॉवर्सच्या लहरींमुळे होणारा त्रास ... या आणि अशा अनेक कारणांमुळे पक्षीविश्व पूर्णपणे विस्कटून गेले आहे. केवळ चिमण्याच नव्हे तर परिसरातील अनेक पक्षी दुर्मीळ होत चालले असून, या पाखरांना घराकडे परत आणण्यासाठी कृत्रिम घरटी बनवणे काळाची गरज आहे. नैसगिर्क अधिवास नष्ट होत असल्याने अनेक पक्षी शहरापासून दूर जात आहेत, हे वास्तव असले तरी आपण नैसर्गिक पद्धतीची घरटी तयार करून त्यांना नक्कीच परत आणू शकतो, हे खाडेंनी दाखवून दिले आहे.
माणसांबद्दल पाखरांना विश्वास वाटणे ही त्याच्या माणूसपणाची बाब आहे. नरेंद्र खाडे यांनी मोठे बंधू गोपाल यांची मदत घेतली. मातीची घरटी छताला टांगली. या परिसरात चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
आप्पा महाजन
कारंजा लाड,
 
@@AUTHORINFO_V1@@