पुन्हा ‘चिपको’ आंदोलनाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |
 
 
 
- आंदोलनाची 45 वर्षे
- आजही वृक्षसंवर्धनाची आवश्यकता
नागपूर, 
 
आपल्या परिसरातील झाडांचा बचाव करण्यासाठी गेल्या शतकात गौरादेवीच्या नेतृत्वात झाडांच्या बुंध्याला घट्ट धरून उभ्या राहत गावकरी महिलांनी इतिहास निर्माण केला. नंतरच्या काळात, ‘चिपको’ आंदोलन म्हणून प्रसिद्ध झालेल्या या निसर्गरक्षकांच्या अहिंसक आंदोलनाला पाच दशके पूर्ण होत आहेत. पण, अजूनही वृक्षसंवर्धनासाठी ही कत्तल थांबविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. चिपको आंदोलनाची सुरुवात 1974 मध्ये 26 मार्च रोजी झाली असल्याने हे औचित्य साधून एक नवी सुरुवात करूया !
...
 
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड प्रयत्नांनंतरही वनाच्छादन क्षेत्राच्या टक्केवारीत महाराष्ट्र माघारला असल्याचे आकडेवारीतून जाहीर झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या चौपट वनाच्छादन म्हणजे साधारण 17 स्क्वेअर किलोमीटर परिसरातील जंगल महाराष्ट्राने गमावले आहे. नागपूर आणि नजीकच्या परिसरातही स्थिती चिंताजनक असून हवामान बदल आणि तापमानात सातत्याने होणारी वाढ हे वृक्षांचे आच्छादन कमी झाल्याचे प्रमाण आहे.
 
देशाच्या वन सर्वेक्षण विभागातर्फे, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वनाच्छादन अहवालानुसार, महाराष्ट्राचे वनाच्छादन 2015 मध्ये 50,699 चौरस किलोमीटर होते. तर 2017 मध्ये त्यात घट होऊन ते 50,682 चौरस किलोमीटर इतके झाले आहे. दर दोन वर्षांनी जारी करण्यात येणारा हा अहवाल उपग्रह छायाचित्रांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केला जातो. राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये 2015 च्या तुलनेत वनाच्छादन कमी झाले आहे. कृषी क्षेत्राचा विस्तार आणि विकासकामांसह नैसर्गिक प्रक्रियेत उन्मळून पडलेल्या झाडांमुळे ही घट झाली असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.
 
दरम्यान, 1987 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 64,055 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र होते. त्यात, तब्बल 2,318 चौरस किलोमीटरची गंभीर घट झाली आहे. संबंधित अहवालानुसार, जंगलक्षेत्राच्या सर्व तीन प्रवर्गांमध्ये महाराष्ट्रात घटच झाली आहे. त्यात, अति घनदाट जंगल, सर्वसाधारण घनदाट जंगल आणि खुल्या वनपरिसराचा समावेश आहे. 2017 च्या आकडेवारीनुसार, अति घनदाट जंगलाचे क्षेत्र 8,027 झाले जे 2015 मध्ये 8,361 चौरस किमी होते. सर्वसाधारण घनदाट जंगलाचे क्षेत्र 2015 च्या 15,939 चौ. किमी वरून घटून 14,168 चौ. किमी वर आले आहे. तर खुल्या जंगलात 2015च्या 13,143 वरून घट होऊन ते 11,596 चौ. किमीवर आले आहे. एकूण वनाच्छादनात 3,652 चौरस किमीची घट झाली आहे. दरम्यान, नियमित वृक्षारोपण होत असले तरी रोपटी जगविण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज असल्याचे दिसते. वनक्षेत्रात आपण जगात दहाव्या क्रमांकावर असलो तरी भारतात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरवर 382 व्यक्ती असून, पहिल्या नऊ देशांमध्ये हे प्रमाण प्रति चौरस किलोमीटरवर 150 व्यक्ती इतके आहे.
 
चौकटीत ....
‘चिपको’चा इतिहास
1730 मध्ये जोधपूरच्या महाराज अभयसिंह यांच्या राजवटीत झालेल्या 363 बिश्णोई नागरिकांच्या हत्याकांडाचा इतिहास सर्वश्रुत आहे. वृक्षांना कवटाळून तोडण्यास विरोध करणार्‍या अमृतादेवीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, गढवालच्या गौरीदेवीने ‘चिपको’ आंदोलन पुनरुज्जीवित केले. रेनी गावाजवळ झाडे तोडण्यासाठी ठेकेदारची माणसे आली. नेमक्या याच वेळी गावातील पुरुषांना नुकसानभरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्यात आले. पण गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरादेवीने 27 महिलांसह झाडांना कवटाळून उभे राहण्याचा निर्णय घेतला. दोन रात्री आणि तीन दिवस चाललेले हे ‘चिपको आंदोलन’ देशभर गाजले आणि गौरीदेवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला.
@@AUTHORINFO_V1@@