परभणीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक थांबवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

 
 
परभणी : परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन गंगाखेडचे तहसिलदार व त्यांचे भरारी पथक यांच्यासह गोदावरी रेल्वे पुलाखाली धाड टाकून चार ट्रॅक्टर व एक पल्सर मोटार सायकल पकडली. यामध्ये तीन ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती भरणे चालू होते आणि एक ट्रॅक्टर पळुन जात असताना परभणीचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी पळता ट्रॅक्टर पकडल्याची घटना काल घडली.
 
 
हे सर्व चारही ट्रॅक्टर आणि एक पल्सर गाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर चालकांनी अवैध उत्खननापोटी केलेले खड्डे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचेमार्फत मोजणी करण्यात आली असून मोजणी प्रमाणे दंडाची रक्कम ट्रॅक्टर धारकांकडून वसूल करुन घेण्यात येणार आहे. तसेच सदर उत्खनानामुळे रेल्वे पुलाला धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारच्या जागेत अवैध उत्खनन होत असल्याने महसूल प्रशासनाची वसुली पश्चात हे प्रकरण (केंद्र सरकार) रेल्वे विभागास सुपुर्द करण्यात येणार आहे.
 
 
या प्रकरणात संबंधितावर गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. या कार्यवाहीमध्ये महसूल प्रशासक आणि पोलीस प्रशासनाने अतिशय नियोजित पध्दतीने सापळा रचून कार्यवाही पार पाडली आहे.आणि यापुढे यापेक्षा अधिक कडक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी परभणी यांनी सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@